• Download App
    युनिटेकच्या मालकांना तिहारमधून मुंबईतील तुरुंगात हलवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश । Shift Unitech owner to mumbai orders court

    युनिटेकच्या मालकांना तिहारमधून मुंबईतील तुरुंगात हलवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – ‘युनिटेक’ या रिअल्टी फर्मचे माजी संचालक संजय चंद्रा आणि अजय चंद्रा यांना दिल्लीतील तिहार तुरुंगातून मुंबईतील आर्थर रोड आणि तळोजा तुरुंगामध्ये हलविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. चंद्रा बंधूंवर दोन हजार कोटी रुपये बेकायदा मार्गाने सायप्रस आणि केमन बेटांवर वळविल्याचा आरोप आहे. Shift Unitech owner to mumbai orders court

    तिहार तुरुंगामध्ये असताना तुरुंगाच्या अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून या दोघांनीही या खटल्याशी संबंधित साक्षीदारांशी संधान साधण्याचा प्रयत्न केला होता. येथून ते बाहेर असलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी मुक्तपणे संवाद साधत होते तसेच मालमत्तांची व्यवस्था लावत होते असेही ‘ईडी’कडून सांगण्यात आले.



    दिल्लीतील ग्रीन पार्क परिसरात या दोघांनीही एक गोपनीय भूमिगत कार्यालय तयार केले होते, पॅरोलवर आणि जामिनावर बाहेर असताना ते येथे काही बाहेरच्या व्यक्तींना भेटत असत अशी खळबळजनक माहिती दिली.

    सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत दिल्ली पोलिस आयुक्तांना याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने तिहार तुरुंग प्रशासनातील अधिकाऱ्यांवरही कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

    Shift Unitech owner to mumbai orders court

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Festival Sales to Hit Record : महागाई भत्ता, बोनस, जीएसटी कपातीमुळे सणासुदीत मोडणार खरेदीचे विक्रम; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढीस मंजुरी

    पराभूत निजामाने तयार केलेले गॅझेट मराठा आरक्षणासाठी स्वीकारण्याचे कारण काय??; खासदार शाहू महाराजांचा परखड सवाल

    Vijay Kumar Malhotra : भाजप नेते विजय कुमार मल्होत्रा ​​यांचे निधन; दिल्लीचे पहिले भाजप अध्यक्ष, मनमोहन सिंग यांचा केला होता पराभव