• Download App
    Sheikh Hasina शेख हसीना यांच्यावर 42,600 कोटी रुपयांच्या

    Sheikh Hasina : शेख हसीना यांच्यावर 42,600 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप; मुलगा, बहीण आणि भाचीलाही केले आरोपी

    Sheikh Hasina

    वृत्तसंस्था

    ढाका : Sheikh Hasina  बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा त्रास काही संपत नाही आहे. मोहम्मद युनूस यांचे सरकार त्यांच्यावर सातत्याने नवनवीन आरोप करत आहे. आता बांगलादेशातील लाचलुचपत प्रतिबंधक आयोगाने (ACC) हसीना आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध सुमारे 42,600 कोटी रुपयांच्या ($ 5 अब्ज) घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे.Sheikh Hasina

    ढाका ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, राजधानी ढाकापासून 160 किमी अंतरावर असलेल्या रूपपूर येथील रशियन-डिझाइन केलेल्या अणुऊर्जा प्रकल्पात हसीना यांच्यावर घोटाळा केल्याचा आरोप आहे.



    रशियन सरकारी कंपनी रोसाटॉमद्वारे उभारण्यात येत असलेल्या या प्लांटमध्ये भारतीय कंपन्यांचाही हिस्सा आहे.

    मलेशियामध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप

    बांगलादेशी उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी एसीसीला या प्रकरणातील निष्क्रियता बेकायदेशीर का घोषित केली जाऊ नये, अशी विचारणा केली होती. तेव्हा हसीना यांच्या विरोधात चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता?

    शेख हसीना, त्यांचा मुलगा सजीब वाजेद जॉय, बहीण रेहाना आणि भाची ट्यूलिप सिद्दीक यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. त्यांनी ही रक्कम मलेशियन बँकेत हस्तांतरित केल्याचा आरोप आहे.

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्यूलिप सिद्दीक, शेख रेहाना आणि इतरांना मनी लाँडर केलेल्या रकमेपैकी 30% कमिशन म्हणून मिळाले होते.

    शेख हसीना सध्या भारतात राहतात, तर त्यांचा मुलगा अमेरिकेत आणि त्यांची भाची ब्रिटनमध्ये आहे. मात्र शेख रेहनाबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.

    सजीब वाजेद म्हणाले- बांगलादेशात राजकीय दडपशाही सुरू

    यापूर्वी सोमवारी बांगलादेशने शेख हसीना यांना परत पाठवण्याची मागणी भारताकडे केली आहे. बांगलादेशचे परराष्ट्र सल्लागार तौहीद हुसैन यांनीही याबाबत पत्र पाठवले आहे. तौहीद हुसेन म्हणतात की बांगलादेश सरकारला माजी पंतप्रधानांनी पुन्हा कायद्याला सामोरे जावे असे वाटते.

    या मागणीवरून शेख हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद यांनी युनूस सरकारवर सडकून टीका केली. त्यावर त्यांनी लिहिले हे न्यायाला बगल देते आणि अवामी लीगच्या नेत्यांवरील हल्ल्यांना प्रोत्साहन देते.

    आधी बांगलादेशचे कांगारू न्यायालय आणि आता हद्दपारीची ही मागणी, तेही अशा वेळी जेव्हा शेकडो नेते आणि कार्यकर्त्यांची बेकायदेशीरपणे हत्या केली जात आहे. त्यांच्यावर खुनाचे आरोप होत आहेत, हजारो लोकांना बेकायदेशीरपणे तुरुंगात डांबले जात आहे.

    जुलै ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या मानवी हक्क उल्लंघनाच्या प्रत्येक घटनेची स्वतंत्र आणि निःपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे, असा आम्ही पुनरुच्चार करतो, पण या सरकारने न्यायालयाचे हत्यार उपसले आहे. या न्याय व्यवस्थेवर आमचा अजिबात विश्वास नाही.

    Sheikh Hasina accused of Rs 42,600 crore scam; Son, sister and niece also accused

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र