विशेष प्रतिनिधी
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना अटक करण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही सहन करणार नाही. साताराच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील जनता या अन्यायाविरोधात पेटून उठेल, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी राज्य सरकारला दिला. Sharad Pawar’s warning, Shashikant Shinde will not tolerate arrest; Only Maharashtra will burn
शरद पवार यांची शनिवारी साताऱ्यातील दहिवडी येथे प्रचारसभा झाली. यावेळी त्यांनी सातारा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या संभाव्य अटकेवरून महायुती सरकारला इशारा दिला. शरद पवार म्हणाले की, भाजप मुंबई मार्केट समितीतील तक्रारीच्या आधारावर शशिकांत शिंदे यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवून काहीही करून त्यांना निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्यावर खटलाही दाखल करण्यात आला आहे. पण आता त्यांना अटक करण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही हा अन्याय सहन करणार नाही. असे काही घडले तर सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते याविरोधात आवाज उठवून संघर्ष करतील, असे शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.
शशिकांत शिंदे व त्यांचे काही सहकारी मुंबई मार्केट समितीत चांगले काम करत आहेत. तिथे काही तक्रारी झाल्या आहेत. त्यानंतर त्या मार्केट समितीत अतिशय उत्तम काम करणाऱ्या पानसरे नामक संचालकाला अटक करण्यात आली आहे, असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
देशात चुकीचा राज्य कारभार सुरू
शरद पवार यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. सद्यस्थितीत देशात चुकीचा राज्य कारभार सुरू आहे. आज झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. या दोघांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. हे दोघेही चांगल्या पद्धतीने सरकार चालवत होते. लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट पटली नसेल, तर योग्य नाही असे म्हणण्याचा तुमचा अधिकार आहे. पण टीका केली म्हणून मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले जात असेल तर योग्य नाही, असे शरद पवार म्हणाले.
मोदींचा पराभव करणे ही राष्ट्रीय गरज
या हुकूमशाहीला वेळीच आवरले नाही या देशात कुणालाही साधे बोलताही येणार नाही. अधिकारांवर गदा येईल. हे टाळायचे असेल तर मोदी व त्यांच्या सरकारचा पराभव करणे गरजेचे आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याची गरज आहे, असे शरद पवार म्हणाले. पंतप्रधान मोदींचा पराभव करणे ही राष्ट्रीय गरज बनली असून, यासाठी आपण एकजूट राहिले पाहिजे, असेही शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले.
निवडणूक अत्यंत महत्त्वाची झालेली आहे. त्याचे कारण जगातल्या अनेक देशांनी या देशातील लोकशाही बघितलेली आहे. जवाहरलाल नेहरू असो, इंदिरा गांधी असो, लाल बहादूर शास्त्री असो, नरसिंह राव असो, देवेगौडा असो, किंवा डॉ. मनमोहन सिंग असो. या सगळ्यांच्या कालखंडामध्ये एवढा मोठा देश, अनेक भाषा बोलणारे लोक, अनेक राजकीय पक्ष हे सगळं असताना सुद्धा हा देश एकसंघ राहिला आणि या देशातील निवडणुका पार पडल्या. अनेक लोकांचे सरकार या देशामध्ये आली हा या देशातील लोकशाहीचा विजय आहे आणि त्याबद्दलचं औत्सुक्य जगातल्या अनेक लोकांच्या समोर आहे.
Sharad Pawar’s warning, Shashikant Shinde will not tolerate arrest; Only Maharashtra will burn
महत्वाच्या बातम्या
- घुसखोरांना एससी, एसटी आणि ओबीसीचे आरक्षण देण्याचा काँग्रेसचा डाव – केशव प्रसाद मौर्य
- मोदी म्हणाले कदाचित मी मागील जन्मी इथेच जन्मलो असेल, नाहीतर…
- भाजप खासदार रवी किशन यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा!
- राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या फाईलींचे कपाट तुम्हीच मोदी साहेबांना उघडायला सांगा; अजितदादा गटाचा पवारांना टोला!!