• Download App
    नाही म्हणणारे पवारच राज्य सरकार पाडतील निलेश राणे यांची जोरदार टीका|Sharad Pawar will topeled government : Nilesh Rane

    नाही म्हणणारे पवारच राज्य सरकार पाडतील निलेश राणे यांची जोरदार टीका

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : नाही, नाही म्हणता एकेदिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडतील, अशी जोरदार टीका भाजपचे नेते निलेश राणे यांनी केली.Sharad Pawar will topeled government : Nilesh Rane

    राज्य सरकारने शेतकरी आणि पूरग्रस्तांना पॅकेज जाहीर केलं असले तरीसुद्धा कोकण आणि मराठवाडा हे प्रतीक्षेतच आहेत. यांना एकही रुपया मिळाला नाही. कॅबिनेटमध्ये आज निधी जाहीर झाला. परंतु तो हेक्टरी किती मिळणार ? हे अस्पष्ट आहे. त्यांच्या घोषणा या हवेत गोळीबार असून जमिनीवर काही नसते, याचा मला अनुभव आहे, असे राणे म्हणाले.



    कोकणावर संकट आले. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र व आता मराठवाडावर संकट येऊन विदर्भावर संकट कोसळून शेतकरी उद्ध्वस्त झाला. यात एक सुद्धा पैसा माझ्या तरी मतदारसंघात मिळाला नाही.

    दसरा मेळावा थेटरमध्ये कसा काय झाला

    गेल्यावर्षी थेटर उघडण्याला परवानगी नव्हती. तरीसुद्धा दसरा मेळावा थेटरमध्ये झाला.त्यांना लोकांचं काही पडलेला नाही तसेच शेतकऱ्यांची कणव देखील नाही

    सर्वच नेते भ्रष्टाचारात गुंतले

    महाराष्ट्रात एक वर्गही सुखी नाही विद्यार्थ्यांच्या परीक्षेत देखील घोळ झालेला आहे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांचं कुलगुरू ऐकत नाही अशी परिस्थिती आहे त्यांचे सर्वच नेते कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अडकलेल्या आहेत त्यात नवाब मलिक धनंजय मुंडे सोबत ठाण्यातले जितेंद्र आव्हाड देखील आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत

    शरद पवारच सरकार पडतील

    पवारांनी सरकार पडणार नाही, असे जरी म्हटले असले तरी पवारच सरकार पाडतील आणि पडणार नाही म्हंटल्यावर म्हणजे शंभर टक्के पडणार आहेत.

    • नाही म्हणणारे पवारच राज्य सरकार पाडतील
    • शेतकरी, पूरग्रस्तांना पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक
    • म्हाविकासचे सर्वच नेते भ्रष्टाचारात गुंतले
    • पुरग्रस्ताना मदतीची घोषणा पोकळ
    • दसरा मेळावा थेटरमध्ये कसा काय झाला होता
    • महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा जोर

    Sharad Pawar will topeled government : Nilesh Rane

     

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र