नाशिक : शरद पवारांचा INDI उमेदवाराला पाठिंबा; पण त्यांचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, असे “पवार बुद्धीचे” तिरके राजकारण आज एकाच दिवशी घडले. Sharad Pawar
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत NDA चे उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा मागण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना फोन केले होते. त्यानंतर आज शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका सांगितली. INDI alliance ने उपराष्ट्रपती पदासाठी मूळात उमेदवार उभा केला आहे. आमच्याकडे संख्याबळ नसले तरी आमचा तात्विक लढा असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याच उमेदवाराला पाठिंबा आहे. त्यामुळे राधाकृष्णन यांना पाठिंबा देऊ शकत नाही, असे आपण देवेंद्र फडणवीस यांना सांगितले, असे पवार म्हणाले.
त्याचबरोबर राधाकृष्णन यांना का पाठिंबा नाही?, याचे वेगळे कारणही पवारांनी सांगितले. राधाकृष्णन झारखंडचे राज्यपाल होते. त्यावेळी एका भ्रष्टाचार प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक झाली. पण आपल्याला राजभवनात अटक करू नये, अशी विनंती सोरेन यांनी केली होती. पण ती राधाकृष्णन यांनी मानली नव्हती. सबब आमचा त्यांना पाठिंबा राहणार नाही, याची आठवण पवारांनी करून दिली.
– खासदार अमर काळे पंतप्रधानांच्या भेटीला
पण एकीकडे पवारांनी भाजप प्रणित NDA उमेदवाराला विरोध असल्याचे जाहीरपणे सांगितल्या त्या दिवशीच त्यांच्या पक्षाचे खासदार अमर काळे यांनी नेमका आजचा “राजकीय मुहूर्त” साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना अमर काळे यांना पंतप्रधान मोदींची अपॉइंटमेंट घ्यावीशी वाटली. मोदींनी लगेच अपॉइंटमेंट दिली. अमर काळे यांना मोदींची भेट घेण्यासाठी अन्य मुहूर्त मिळाला नाही म्हणून त्यांनी आजच पंतप्रधान मोदींची भेट घेतली.
या भेटीची माहिती अमर काळे यांनी स्वतः सोशल मीडिया हँडलवरून दिली. नवी दिल्लीत देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांची भेट घेतली. वर्धा लोकसभा मतदारसंघ विकसित करण्याच्या व रोजगाराला चालना देण्याच्या दृष्टीने राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या ग्रामोद्योगाच्या विचारांवर आधारित देशातील एकमेव संस्था असलेल्या महात्मा गांधी ग्रामीण औघोगिकिकरण संस्था (MGIRI) च्या सर्वांगीण विकासाकरिता व संस्थेच्या विस्तारीकरणाकरिता लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली, असे अमर काळे यांनी ट्विटमध्ये नमूद केले.
वास्तविक उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाल्यानंतर अमर काळे यांना पंतप्रधानांची भेट घेता येऊ शकली असती. कारण त्यांनी ज्या कारणासाठी पंतप्रधानांची भेट घेतली, तो विषय एवढ्या तातडीचा नव्हताच. पण उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे राजकीय घमासान सुरू असताना शिवाय शरद पवारांनी INDI आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा व्यक्त केला असताना नेमक्या त्याच दिवशी खासदार अमर काळे यांना पंतप्रधानांची भेट घ्यावीशी वाटली. यातून “पवार बुद्धीने” बरेच राजकारण साधले गेले.
Sharad Pawar supported INDI alliance candidate but his MP meets PM Modi
महत्वाच्या बातम्या
- आगमना आधीच गणरायाची कृपादृष्टी; सरकारी नोकरदारांचा 26 ऑगस्टलाच पगार; आर्थिक तंगी टाळण्यासाठी फडणवीस सरकारचा निर्णय
- Sanjay Kumar : सीएसडीएस संचालक संजय कुमार यांच्याविरुद्ध FIR; 2 जागांवर कमी मतदारांचा दावा केला होता
- Trump : ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाजवळ 3 युद्धनौका पाठवल्या; ड्रग माफियांचा बंदोबस्त करण्याचा उद्देश
- Malaysia : मलेशियात नमाज पठण विसरल्यास 2 वर्षे शिक्षा; तेरेंगानू राज्यातील शरिया कायद्यात बदल, 60 हजार रुपये दंड