• Download App
    Sharad Pawar

    तेराव्या बॉम्बस्फोटाची स्टोरी मुंबई “वाचवण्यासाठी”; दोन माणसांच्या भेटीची स्टोरी राहुल गांधींना बातम्यांच्या केंद्रस्थानावरून हटविण्यासाठी??

    नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आजच्या नागपूर मधल्या पत्रकार परिषदेत दोन माणसे भेटल्याची स्टोरी सांगितली. पण त्यामुळे पवारांच्या पुड्या सोडण्याच्या जुन्या सवयीची आठवण झाली.

    शरद पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रात 160 जागा निवडून आणायची गॅरंटी देणाऱ्या दोन माणसांची स्टोरी सांगितली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन माणसे म्हणे, पवारांना भेटायला आली होती. त्यांनी पवारांना म्हणे, 160 जागा निवडून आणायची गॅरंटी दिली होती. याचा अर्थ 160 जागांवर मतदानामध्ये फेरफार करायची त्या दोन माणसांची तयारी होती. पवारांनी त्या दोन माणसांची राहुल गांधींशी भेट घालून दिली. त्या दोन माणसांनी राहुल गांधींना सुद्धा 160 जागा निवडून आणायची गॅरंटी दिली. पण नंतर म्हणे, पवारांचे आणि राहुल गांधींचे असे ठरले की, त्या दोन माणसांकडे लक्ष देण्यास मतलब नाही. आपण लोकांकडे जाऊन आशीर्वाद मागू या. लोकांनी दिलेला कौल स्वीकारू या!! ही सगळी स्टोरी शरद पवारांनी आज नागपूर मधल्या पत्रकार परिषदेत सांगितली.

    त्यामुळे महाराष्ट्रातल्या बातम्यांचा सगळा रोख शरद पवारांच्या दोन माणसांच्या स्टोरी कडे वळला. महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय नेत्यांनी पवारांच्या दोन माणसांच्या स्टोरीवर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. मराठी माध्यमांनी देखील दोन माणसांची स्टोरी चांगलीच उचलून धरली. पवारांना भेटलेली दोन माणसे कोण??, याविषयी सगळ्यांच्याच मनात दाट शंका तयार झाली. पवारांची दोन माणसांची स्टोरी देशभर पोचली देशभरातल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी त्यांच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करायला सुरुवात केली. त्यामुळे पवार आणि त्यांची दोन माणसांची स्टोरी महाराष्ट्र बरोबरच देशाच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आली.



    – पवारांना स्टोरी का सांगावी लागली??

    लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी भले मोठे प्रेझेंटेशन करून कर्नाटकात मतांची चोरी झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी एकच प्रेझेंटेशन पत्रकार परिषदेत आणि नंतर INDI आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत केले होते. राहुल गांधींच्या प्रेझेंटेशनच्या आकडेवारीची चर्चा सगळ्या देशभर झाली निवडणूक आयोगाने दखल घेऊन त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले. राहुल गांधी देशभरातल्या राजकीय वर्तुळातल्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले. या सगळ्यांमध्ये बाकीच्या विरोधी पक्षांच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांची राहुल गांधींच्या राजकीय मुद्द्यांमध्ये फरफट झाली. राहुल गांधी म्हणतील त्याला त्यांना मान्यता द्यावी लागली. त्यामुळे अनेकांची इच्छा नसताना INDI आघाडीचे नेतृत्व आपोआप राहुल गांधीकडे गेले. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या या खेळीपुढे बाकीचे प्रादेशिक विरोधी पक्ष झाकोळले गेले. त्यावर काहीतरी तोड काढायला हवी होती, म्हणून पवारांनी नागपूर मध्ये आजच्या पत्रकार परिषदेत दोन माणसांची स्टोरी सांगितली. त्याबरोबर माध्यमांच्या बातम्यांचा रोख राहुल गांधींच्या कडून शरद पवारांच्या दोन माणसांच्या स्टोरी कडे वळला. बातम्यांच्या केंद्रस्थानी राहुल गांधी यांच्याबरोबरच शरद पवार आणि त्यांचे दोन माणसे येऊन बसली. राहुल गांधींच्या केंद्रस्थानी बातम्यांना पवारांनी धक्का दिला.

    – तेराव्या बॉम्बस्फोटाची पुडी

    पण पवारांची अशा पुड्या सोडायची बातमी सवय जुनीच आहे. मुंबईमध्ये 12 बॉम्बस्फोट झाले होते ते सगळे हिंदू बहुल इलाख्यात झाले, हे लक्षात येताच पवारांनी मुंबईत तेरावा बॉम्बस्फोट मशिद बंदरापाशी झाला, अशी पुडी सोडली होती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 13 बॉम्बस्फोट झाल्याची बातमी दिल्याने सगळीकडे मुंबई 13 बॉम्बस्फोट झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर स्वतः पवारांनीच आपण मुंबईमध्ये हिंदू – मुस्लिम दंगल होऊ नये. मुंबई वाचावी म्हणून तेराव्या बॉम्बस्फोटाची पुडी सोडली होती, अशी जाहीर कबुली दिली होती. त्याचे समर्थन त्यांनी वारंवार केले होते.

    – राहुल गांधींना अडकवले जाळ्यात

    पण त्यामुळेच पवारांनी राहुल गांधींच्या वरचे माध्यमांचे लक्ष हटवण्यासाठी दोन माणसे भेटल्याची पुडी अशीच सोडून दिली क??, याविषयी दाट शंका तयार झाली. शिवाय पवारांनी ती दोन माणसे कोण?? हे तर सांगितले नाहीच, त्याचबरोबर त्या दोन माणसांची राहुल गांधींशी भेट घालून दिली, असे सांगून राहुल गांधींना देखील संशयाच्या भोवऱ्यात आणून ठेवले. त्यामुळे इथून पुढे राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली, पत्रकारांनी त्या दोन भेटलेल्या माणसांविषयी त्यांना प्रश्न विचारावे अशी “व्यवस्था” करून ठेवली.

    Sharad Pawar punches out Rahul Gandhi from media centre stage

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Despite Trump : ट्रम्पच्या टॅरिफच्या धमकी नंतरही भारतीय अर्थव्यवस्थेचे ‘अच्छे दिन’ सुरूच, जीडीपी 7.8 टक्क्यांवर

    Rahul Gandhi : राहुल गांधी पुन्हा तोंडावर पडले, बिहारमधील गावकऱ्यांनी उघड केला खोटा दावा

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड