• Download App
    सावरकर मुद्द्यावर बॅकफूटवर ढकलेले काँग्रेस नेतृत्व अदानी मुद्द्यावर पवारांच्या मुलाखतीच्या डावपेची राजकारणापुढे झुकेल??|Sharad Pawar ndtv interview : will Congress leadership bow down on adani issue infront of Pawar politics??

    सावरकर मुद्द्यावर बॅकफूटवर ढकलेले काँग्रेस नेतृत्व अदानी मुद्द्यावर पवारांच्या मुलाखतीच्या डावपेची राजकारणापुढे झुकेल??

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : एकीकडे विरोधी ऐक्याचे प्रयत्न सुरू असताना सावरकर – अदानी मुद्द्यांवर शरद पवारांनी दिलेल्या कानपिचक्या काँग्रेस नेतृत्वाच्या पचनी पडतील का??, हा महत्त्वाचा प्रश्न आता तयार होत आहे. त्यातही सावरकर हा परसेप्शनचा मुद्दा आहे असे गृहीत धरता येईल, पण अदानी मुद्दा “तेवढा सोपा” नाही, की पवारांनी एनडीटीव्हीला मुलाखत देऊन कानपिचक्या देण्याचे डावपेच वापरल्याने काँग्रेस त्यापुढे झुकेल!!Sharad Pawar ndtv interview : will Congress leadership bow down on adani issue infront of Pawar politics??

    राहुल गांधी यांनी सावरकर मुद्द्यावर काँग्रेस बॅकफूटवर जाणे स्वीकारले. पण आता ज्यावेळी शरद पवारांनी एनडीटीव्हीच्या मुलाखतीतून अदानी मुद्द्यावर काँग्रेसला कानपिचक्या दिल्या आहेत, त्यावेळी काँग्रेस इतक्या सहजपणे त्या कानपिचक्या स्वीकारेल का??, हा केवळ काँग्रेस आणि शरद पवार यांच्या संबंधापुरता मर्यादित विषय नसून तो थेट विरोधी ऐक्यावर परिणाम करणारा विषय ठरण्याची दाट शक्यता आहे.



    सावरकर मुद्द्यावर काँग्रेस चोहोबाजूने अडचणीत आल्यामुळे राहुल गांधींनी मौन स्वीकारले हे खरे आहे, पण अदानी सारखा मुद्दा ज्या जोरकसपणे राहुल गांधी रेटून पुढे लावून धरत आहेत, तो तितक्या सहजपणे मागे घेणे काँग्रेसला शक्य आहे का??, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. किंबहुना राहुल गांधी आणि काँग्रेस या दोहोंसाठी अदानी मुद्दा हा “नाक का बाल” झाला आहे.

    सावरकर मुद्द्यावर बॅक फुटला जावे लागल्यापासून काँग्रेसचे केंद्रातले नेते तरी विलक्षण सावध आहेत. सार्वजनिकरित्या आता ते सावरकरांवर बोलत नाहीत. किंबहुना भाजपने वेगवेगळे विषय घेऊन फिरवून ते काँग्रेसवर सोडले, तरी काँग्रेसचे केंद्रातले नेते ते विषय अदानी मुद्द्यावर आणून सोडतात. ही त्यांची राजकीय चतुराई गेल्या काही दिवसांपासून दिसते आहे. मग भले भाजपचे नेते अदानी मुद्द्यावर काँग्रेसला उत्तर देत नसतील किंवा उत्तर देणे टाळत असतील, पण काँग्रेस आणि राहुल गांधी अदानींच्या शेल कंपनीचा मुद्दा सोडायला तयार नाहीत. अदानींच्या शेल कंपनीत 20000 कोटी रुपये कुणाचे आले??, हा काँग्रेसच्या दृष्टीने “नाक का बाल” असलेला प्रश्न आहे. भले त्यावर सत्ताधारी भाजप संयुक्त संसदीय समिती अर्थात जेपीसी नेमणार नाही. कारण भाजपकडे बहुमत आहे. पण तरीही काँग्रेस आणि राहुल गांधी हा मुद्दा सोडायला तयार नाहीत, याचा अर्थ नीट समजावून घेतला पाहिजे आणि तो अर्थ समजून घेण्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजेच एनडीटीव्हीला शरद पवारांनी दिलेल्या मुलाखतीत अदानींची बाजू उचलून धरण्याचा आहे.

    पवारांच्या राजकीय चतुर्याचा मोदींकडून वापर

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेहमीच शरद पवारांच्या राजकीय चातुर्याचा वापर स्वतःच्या राजकीय कौशल्याने काँग्रेस विरोधात केला आहे. त्याचे विशिष्ट टायमिंग साधण्याचा प्रयत्नही मोदींनी केला आहे. पवारांनी एनडीटीव्हीच्या मुलाखतीत अदानींची बाजू उचलून धरणे हे मोदींचे राजकीय टाइमिंग साधण्याचाच एक प्रकार असल्याचे दिसते. हे उघड राजकारण आहे. पण ते काँग्रेसला समजत नसेल असे मानण्याचे कारण नाही. म्हणूनच भले मोदींनी डावपेचातात्मक भाग म्हणून पवारांमार्फत अदानींची बाजू वेगळ्या पद्धतीने उचलून धरलीही असेल, पण म्हणून काँग्रेस आणि राहुल गांधी त्या गोष्टीला बधतील आणि ते अदानी मुद्द्यावर माघार घेतील, ही शक्यता फार कमी आहे!!

    अदानी मुद्दा जास्त डीप रूटेड

    सावरकर मुद्दा परसेप्शनचा होता. अदानी मुद्दा जास्त “डीप रूटेड” आहे आणि काँग्रेसही भले आज संख्यात्मक पातळीवर आकुंचित झालेला पक्ष असेल, पण तो राष्ट्रीय पक्ष आहे आणि वर्षानुवर्षे सत्तेचे राजकारण करण्यात मुरलेला पक्ष आहे, हे विसरून चालणार नाही. म्हणून अदानी मुद्यावर काँग्रेस आणि राहुल गांधी पवारांसारख्या राष्ट्रीय इमेज असलेल्या पण प्रत्यक्षात प्रादेशिक मर्यादा असलेल्या नेत्याच्या राजकीय डावपेचांपुढे झुकतील का??, याविषयी दाट शंका वाटते!!

    Sharad Pawar ndtv interview : will Congress leadership bow down on adani issue infront of Pawar politics??

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य