निवृत्तीबाबतही अजित पवारांना केलेल्या विधानाला दिलं प्रत्युत्तर
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाबंडखोरी झाल्यापासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज(गुरुवारी) पार पडली. Sharad Pawar held NCP meeting in Delhi
बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी अजित पवार यांना पक्षाध्यक्ष करण्याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. ‘’मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे. अशा स्थितीत आता मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे, असे कोणी म्हणत असेल, तर त्याला महत्त्व देऊ नये.’’ असं शरद पवार म्हणाले.
अजित पवार यांनी केलेल्या निवृत्तीच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले की, मी ८२ वर्षांचा असो की ९२ वर्षांचा असो, काही फरक पडत नाही. बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते पीसी चाको यांनी सांगितले की, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि एनडीएशी हातमिळवणी केलेल्या ९ आमदारांची हकालपट्टी करण्याच्या शरद पवारांच्या निर्णयाला पक्षाने मान्यता दिली आहे.
याशिवाय चाको म्हणाले की, शरद पवार यांच्याकडे २७ राज्य समित्या आहेत. आम्ही शरद पवार यांना पुढील कारवाईसाठी अधिकृत केले आहे. अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यासह नऊ आमदारांनी राष्ट्रवादीविरोधात बंडखोरी केली आहे.
Sharad Pawar held NCP meeting in Delhi
महत्वाच्या बातम्या
- Gurpatwant Singh Pannu: अमेरिकेत कार अपघातात खलिस्तानी दहशतवादी पन्नूचा मृत्यू झाल्याचा दावा!
- राष्ट्रवादीतले अधोरेखित 3 : 83 वर्षांचा योद्धा मैदानात; पण 54 वर्षांची योद्धा अजूनही “राजकीय कवचात”!!
- 69 वर्षांच्या ज्येष्ठ नेत्याला 64 वर्षांचे नेते निघाले होते, बैल बाजार दाखवायला!!; आज ते 83 वर्षांचे योद्धा आहेत!!
- ‘’…तर पेट्रोल १५ रुपये प्रतिलिटर मिळू लागेल’’, नितीन गडकरींचा नवा फॉर्म्युला!