• Download App
    माजी पत्नीनेच काढली लाज, म्हणाल्या हाच काय तो इम्रान खान यांचा नवा पाकिस्तान|Shame, Imran Khan's ex wife says is this new Pakistan of Imran Khan

    माजी पत्नीनेच काढली लाज, म्हणाल्या हाच काय तो इम्रान खान यांचा नवा पाकिस्तान

    विशेष प्रतिनिधी

    इस्लामाबाद : गाडीवर जीवघेणा हल्ला झाल्यावर माजी पत्नीनेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची लाज काढली आहे. ‘हाच काय तो इम्रान खान यांचा नवा पाकिस्तान?’ असा प्रश्नही इम्रान खान यांच्या पत्नी रेहम खान यांनी विचारला आहे.Shame, Imran Khan’s ex wife says is this new Pakistan of Imran Khan

    रेहन खान यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, काही अज्ञात लोकांकडून आपल्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. आपल्या पुतण्याच्या लग्नात सहभागी झाल्यानंतर रेहम खान आपल्या घरी परतत असताना हा हल्ला घडवून आणण्यात आला. मी माझ्या पुतण्याच्या लग्नानंतर घरी परत जात असताना काही लोकांनी अचानक माझ्या गाडीवर गोळीबार केला.



    दोन मोटारसायकलस्वारांनी बंदुकीच्या जोरावर माझी कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मी तत्काळ माझी गाडी बदलली. माझा सुरक्षा रक्षक आणि चालक गाडीतच उपस्थित होते’ असं रेहान खान यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

    हाच इम्रान खान यांचा नवा पाकिस्तान आहे का? भ्याड, लुटारू आणि लोभी लोकांच्या देशात आपलं स्वागत आहे असे म्हणत रेहान खान यांनी म्हटले आहे की मला एखाद्या सामान्य पाकिस्तानी नागरिकाप्रमाणे पाकिस्तानात जगायचं आणि मरायचंय.

    मग माझ्यावर भ्याड हल्ला होवो किंवा कायदा-सुव्यवस्था रस्त्यात चिंध्या उडवल्या जावोत. याची जबाबदारी या तथाकथित सरकारनं घ्यायला हवी. मी माझ्या देशासाठी गोळ्या झेलण्यासही तयार आहे.

    Shame, Imran Khan’s ex wife says is this new Pakistan of Imran Khan

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Delhi Blast, : दिल्ली स्फोटप्रकरणी अतिरेकी उमरच्या आणखी एका साथीदाराला अटक; ड्रोन-रॉकेट बनवले, तांत्रिक मदत पुरवली

    CJI BR Gavai : सरन्यायाधीश बी.आर. गवई यांचे आरक्षणावर मोठे वक्तव्य, अनुसूचित जातींतही (SC)लागू व्हावे ‘क्रीमी लेयर’

    Nitish Kumar : नितीश कुमार 20 नोव्हेंबरला गांधी मैदानावर शपथ घेणार; BJP आणि JDU मध्ये प्रत्येकी 16 मंत्री