प्रतिनिधी
नवी दिल्ली : “हे” फक्त भारतातच शक्य आहे अशा शब्दांमध्ये उत्तर दिले आहे. शाह फैसल यांनी ऋषी सुनक यांच्या ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या निवडीवरून भारताला उदारमतवादाचे धडे शिकवणाऱ्यांना शाह फैसल यांनी प्रत्युत्तर दिले आहे हेच ते शाह फजल आहेत, जे जम्मू-काश्मीरचे रहिवासी आहेत आणि आयएएस परीक्षेत टॉपर आहेत. Shah Faisal’s reply to Rishi Sunak teaching liberalism to India
शाह फैसल यांनी एक ट्विट केले आहे. यात ते म्हणतात, की “हे” फक्त भारतातच शक्य आहे की काश्मीरचा रहिवासी एक मुस्लिम युवक भारतीय नागरी परीक्षा अर्थात आयएएस मध्ये टॉपर होतो. मनपसंत प्रशासकीय सेवेत जातो. तिथले वरिष्ठ पद भूषवतो. मग तेथून स्वेच्छेने बाजूलाही होतो. नंतर काही दिवसांनी तो सेवेत परततो. सरकार देखील त्याला सेवेत परत येण्याची संधी देते. हे फक्त भारतातच घडू शकते. ऋषी सुनक यांची निवड ही तर छोटी बाब आहे.
ऋषी सुनक यांच्या निवडीनंतर भारतातल्या लिबरल्सनी मोदी सरकार आल्यानंतर भारताच्या उदारमतवादाविषयी शंका व्यक्त करणाऱ्या विविध पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे नेते जर ब्रिटनचे पंतप्रधान होऊ शकतात, तर सोनिया गांधी भारताच्या पंतप्रधान का होऊ शकत नाहीत?, असे प्रश्न देखील अनेकांनी विचारले आहेत.
शाह फैसल यांचे ट्विट अशाच लिबरल्सना तडाखा देणारे उत्तर देत आहे. शाह फैसल यांच्याच बाबतीत त्यांनी उल्लेख केलेली घटना घडली आहे. ते देशात आयएएस परीक्षेत टॉपर झाले. ते प्रशासकीय सेवेत शिरले. तेथून त्यांनी राजीनामा दिला. काश्मीरच्या राजकारणात आपले नशीब आजमावले. पण नशिबाने साथ न दिल्याने ते पुन्हा प्रशासकीय सेवेत परत आले. हे भारतात घडले आहे. याचीच आठवण शाह फैसल यांनी आपल्या ट्विट मधून करून दिली आहे.
Shah Faisal’s reply to Rishi Sunak teaching liberalism to India
महत्वाच्या बातम्या
- WhatsAppDown; ट्रोलर्स अप!; युजर्सची भन्नाट मीम्स
- वाजपेयी हे नेहरू जमान्याचे प्रॉडक्ट; तर मोदींना नेहरूंची विरासत खतम करायचीय; जयराम रमेश यांचे शरसंधान
- Solar Eclipse : सूर्यग्रहण पाहा, आनंद लुटा पण काळजी घ्या, सुरक्षित रहा
- ऋषी सुनक यांची निवड आणि चिदंबरम यांची भारतीयांना शिकवणी; सुप्त हेतू काय??