• Download App
    निकालांना २२ दिवस बाकी असताना संभाव्य आमदारांची राजस्थानात रवानगी; काँग्रेस – बद्रुद्दीन अजमल यांच्या महाजोटचा “माइंड गेम”|Several AIUDF candidates for Assam Assembly polls shifted to Jaipur today. A few more Congress candidates will also be shifted to Jaipur shortly

    निकालांना २२ दिवस बाकी असताना संभाव्य आमदारांची राजस्थानात रवानगी; काँग्रेस – बद्रुद्दीन अजमल यांच्या महाजोटचा “माइंड गेम”

    वृत्तसंस्था

    गुवाहाटी :  आसाममध्ये २ मे नंतर आपलेच सरकार येणार आहे, अशा अविर्भावात काँग्रेस आणि बद्रुद्दीन अजमल यांच्या ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंट महाजोट अर्थात आघाडीने बडी राजकीय खेळी करण्याचा आव आणला आहे.Several AIUDF candidates for Assam Assembly polls shifted to Jaipur today. A few more Congress candidates will also be shifted to Jaipur shortly

    या आघाडीतून विधानसभेची निवडणूक लढविलेल्या निवडक उमेदवारांना राजस्थानातल्या जयपूरला सेफ राजकीय़ झोनमध्ये हालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार काही उमेदवारांची रवानगी देखील जयपूरला करण्यात आली आहे.



    काही उमेदवारांची उद्या रवानगी करण्यात येणार आहे. या सगळ्या उमेदवारांच्या शाही निवासाची व्यवस्था हॉटेल फेअरमाऊंटमध्ये करण्यात आली आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

    आसाममध्ये ६ एप्रिलला मतदान झाले आहे. उमेदवार आता निवांत आहेत. पण काँग्रेस आणि बद्रुद्दीन अजमल यांच्या गोटात खळबळ आहे. राज्यात कदाचित त्रिशंकू विधानसभा येईल आणि भाजप आपल्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करेल, हे दाखविण्याचा महाजोटच्या नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी हा माइंड गेम खेळण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

    प्रत्यक्षात आसाममध्ये भाजप बहुमताने पुन्हा सत्तेवर येण्याचे भाकीत प्रत्येक निवडणूकपूर्व मतचाचणीत करण्यात आले आहे. बहुतेक सगळ्या एजन्सीस आणि न्यूज चॅनेल्सनी राज्यात भाजपलाच बहुमत मिळेल असे दाखवून झाले आहे. तरीही काँग्रेस आणि बद्रुद्दीन अजमल यांना आशा आहे.

    आसाममध्ये तर पुढचे राज्य टोपी – दाढी आणि लुंगीचे असेल, अशी दर्पोक्ती बद्रुद्दीन अजमल यांच्या चिरंजीवांनी जाहीर सभेत केली आहे. पण आपलेच संभाव्य आमदार फुटू नयेत, यासाठी त्यांच्या पक्षाने आपल्या उमेदवारांना राजस्थानात जयपूरला काँग्रेस राजवटीच्या आश्रयाला पाठिवले आहे.

    Several AIUDF candidates for Assam Assembly polls shifted to Jaipur today. A few more Congress candidates will also be shifted to Jaipur shortly

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!