विशेष प्रतिनिधी
लखनौ – उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणूकीसाठी सात छोट्या पक्षांनी सत्ताधारी भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. समाजवादी पक्ष (सपा) आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष (सुभासपा) यांच्यातील युतीच्या घोषणेनंतर आता ही घडामोड घडली आहे.Seven small parties will back BJP in UP
हिस्सेदारी मोर्चा असे सात पक्षांच्या आघाडीचे नाव आहे. त्यांच्यावतीने एक निवेदन जारी करण्यात आले. त्यानुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांना पाठिंब्याविषयीची पत्रे सात पक्षांच्या नेत्यांनी बुधवारी दिली.
भारतीय मानव समाज पक्षाचे केवट रामधनी बिंद, मुसाहर आंदोलन मंचचे चंद्रा वनवासी, शोषित समाज पक्षाचे बाबुलाल राजभर, मानव हित पक्षाचे कृष्णगोपाल सिंह कश्यप, भारतीय सुहेलदेव जनता पक्षाचे भीम राजभर, पृथ्वीराज जनशक्ती पक्षाचे चंदनसिंह चौहान आणि भारतीय समता समाज पक्षाचे महेंद्र प्रजापती या नेत्यांनी ही पत्रे दिली.
Seven small parties will back BJP in UP
महत्त्वाच्या बातम्या
- PADMA AWARDS 2021 : बीजमाता राहीबाईंचा दिल्लीत गौरव ! नथीचा नखरा…नव्हे…नव्हे ‘गावरान’ ठसका! कोण आहेत राहीबाई पोपेरे ?
- तेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी
- मोदी ज्याप्रकारे देश चालवित आहेत तशी तुम्हाला मुंबई महापालिकाही चालविता येत नाही, नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- लिओनार्डो डिकॅप्रियोला पाहताच जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझच्या फॅन गर्ल मोमेंटचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल