विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीतील गोकलपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील गोकलपूर गावात शुक्रवारी रात्री उशिरा लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला. आगीमुळे ३० झोपड्या जळून खाक झाल्या. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. Seven killed in Delhi slum fire
ईशान्य दिल्लीचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त म्हणाले की, दुपारी एकच्या सुमारास गोकलपुरी पोलीस स्टेशन परिसरात आग लागल्याची माहिती मिळाली. तात्काळ बचाव उपकरणांसह एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. आम्ही अग्निशमन विभागाशीही संपर्क साधला, त्यांनी तातडीने कारवाई केली, असे ते म्हणाले. पहाटे ४ वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली तोपर्यंत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. आगीमुळे ३० झोपड्या जळून खाक झाल्या.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले की, ‘सकाळी ही दुःखद बातमी आली. मी स्वतः तिथे जाऊन पीडितांना भेटेन.’ दिल्ली अग्निशमन सेवेने सांगितले की, गोकलपुरी भागातील गोकलपूर गावातील झोपडपट्टीत शनिवारी रात्री एक वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. १३ वाहने घटनास्थळी पाठवण्यात आली.
Seven killed in Delhi slum fire
महत्त्वाच्या बातम्या
- युक्रेनमधून काश्मीरमधील तरुण सुखरूप परतला; वडिलांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार
- रायगडसह किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव; उपमुख्यमंत्री पवार
- जपानमध्ये विद्यर्थिनींच्या पोनी टेलवर बंदी; सर्व शाळांमध्ये नियम लागू
- Anil Parab Resort : अनिल परबांच्या बेनामी रिसॉर्ट केसची 30 मार्चला सुनावणी; किरीट सोमय्यांचे ट्विट