विशेष प्रतिनिधी
इटानगर : अरुणाचल प्रदेश राज्यातील डोंगराळ भागात हिमस्खलनात सात जवानांचा मृत्यू झाला. हिमस्खलनाची घटना कामेंग सेक्टरच्या अति उंचावरच्या भागात घडली. या संपूर्ण परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बर्फवृष्टी होत आहे. Seven killed in Arunachal avalanche
लष्कराने मंगळवारी या दुःखद बातमीस दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे एक दिवसापूर्वीच हे सैनिक बर्फाखाली गाडले गेल्याचे बोलले जात होते. यानंतर त्यांना वाचवण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र बचाव पथकाला जवानांचे मृतदेह आता सापडले.
हिमस्खलन कामेंग सेक्टरच्या उच्च उंचीच्या भागात घडले. बेपत्ता जवान रविवारी लष्कराच्या गस्तीचा भाग होते. त्यानंतर त्यांना हिमस्खलनाचा तडाखा बसला. त्यांचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञांचे पथक विमानाने घटनास्थळी पाठवण्यात आले. त्यांची मदत बचाव कार्यात घेता येईल, असे वाटत होते, मात्र, परिसरातील खराब हवामानामुळे बचाव काम कठीण झाले.
महत्त्वाच्या बातम्या
- नानांनी दिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम; उद्या महाराष्ट्रभर भाजप कार्यालयांसमोर काँग्रेसचे आंदोलन
- काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे विसरलात का?; राधाकृष्ण विखे-पाटलांचा सुप्रिया सुळेंना टोला!!
- राज्यसभेत मोदींचे उफाळले पवार प्रेम!!; सुप्रियांनी मोदींवर टाकली टीकेची गेम!!
- लता मंगेशकरांनी पटेल, नेहरूंची गाणीही गायिली नाहीत बाळासाहेब आंबेडकर यांचे वक्तव्य