• Download App
    सिरम इन्स्टिट्यूट ब्रिटनमध्ये करणार २२०० कोटी रुपयांची गुंतवणूक, आदर पूनावाला यांची घोषणा|Serum Institute to invest Rs 2,200 crore in UK, Adar Poonawala announces

    सिरम इन्स्टिट्यूट ब्रिटनमध्ये करणार २२०० कोटी रुपयांची गुंतवणूक, आदर पूनावाला यांची घोषणा

    सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया इंग्लंडमध्ये २२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. भारतामध्ये कोरोना प्रतिबंधक लशींची टंचाई निर्माण झाल्याने इतर देशांना लस पुरविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे ब्रिटनमध्ये प्रकल्प सुरू करणार असल्याची घोषणा सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी केली.Serum Institute to invest Rs 2,200 crore in UK, Adar Poonawala announces


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया इंग्लंडमध्ये २२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. भारतामध्ये कोरोना प्रतिबंधक लशींची टंचाई निर्माण झाल्याने इतर देशांना लस पुरविण्यात अडचणी येत आहेत.

    त्यामुळे ब्रिटनमध्ये प्रकल्प सुरू करणार असल्याची घोषणा सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी केली.ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी याबाबतची घोषणा केली. ते म्हणाले, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ब्रिटनमध्ये गुंतवणूक करणार आहे.



    ब्रिटनमध्ये लस उत्पादन सुरू होणार आहे. सुमारे ३३.४ कोटी डॉलर्स म्हणजे २२०० कोटी रुपयांची ही गुंतवणूक असणार आहे. यामध्ये विक्री कार्यालय, वैद्यकीय चाचण्या, संशोधन आणि विकास विभाग (आर अ‍ॅँड डी) यांचा समावेश आहे. त्याचबरोबर उत्पादन प्रकल्पही सुरू होणार आहे.

    सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील आघाडीची लस उत्पादक कंपनी आहे. ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या सहकार्याने कोरोना लशीचे उत्पादन सुरू केले आहे. त्याचबरोबर नाकावाटे देण्यात येणाऱ्या लशीचे उत्पादनही येथे होणार आहे.

    युरोपिय यूनियनमधून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनने इतर देशांना गुंतवणुकीची दारे उघडी केली आहे. त्यामुळे भारतातून ब्रिटनमध्ये एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार आहे. यामुळे साडेसहा हजार नव्या नोकऱ्या तयार होणार आहेत.

    सिरम इन्स्टिट्यूटने जगातील अनेक देशांशी लस पुरविण्याचे करार केले आहेत. त्यामुळे इतर देशांमध्येही लस उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन सिरमने केले आहे.

    त्यामुळे आदर पूनावाला सध्या ब्रिटनमध्ये आहेत. पुढील सहा महिन्यात सिरमचे लस उत्पादन अडीच अब्ज डॉलर्सवरून तीन अब्जवर नेण्याचे उद्दिष्ठ असल्याचे पूनावाला यांनी म्हटले आहे.

    Serum Institute to invest Rs 2,200 crore in UK, Adar Poonawala announces

    महत्त्वाची बातमी

    Related posts

    महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खानला अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

    Vande Metro Train: वंदे मेट्रो ट्रेन लवकरच सुरू होणार, प्रवाशांना मिळणार इंटरसिटीसारख्या सुविधा!

    सलमान खान गोळीबार प्रकरण: अटक केलेल्या सर्व आरोपींवर मुंबई पोलिसांनी लावले ‘MCOCA’ कलम!