विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या काळात कॉँग्रेसमध्ये एकून घेतले जात होते. मात्र, आता कॉँग्रेसमध्ये बोलूच दिले जात नाही, अशी टीका कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. नवा राजकीय पक्ष काढण्याचा विचार नसल्याचे सांगतानाच राजकारणात पुढे काय घडणार हे कुणीच सांगू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.Senior Congress leader Ghulam Nabi Azad hints at new party, criticizes Gandhi family for insulting leadership
आझाद यांनी जम्मू-काश्मीरमध्ये अनेक बैठका तसेच सभा घेतल्या आहेत. त्यामुळे तर्कांना उधाण आले आहे. त्यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या २० जणांनी अलीकडेच काँग्रेसचा निरोप घेतला आहे. बैठका घेण्याबद्दल ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्यात आल्यानंतर राजकीय उपक्रम ठप्प झाले होते.
त्यास संजीवनी देण्याचा उद्देश आहे. पाच आॅगस्ट २०१९ पासून अनेकांना तुरुंगात टाकण्यात आले. जे तुरुंगाबाहेर आहेत त्यांना कोणतेही राजकीय कार्य करू दिले जात नाही. त्यामुळे मी वाव मिळताच सुरवात केली. विशेष म्हणजे इतर पक्षही आता काम करू लागले आहेत. आम्ही सुरवात करून त्यांना जागे केले.
नवा पक्ष काढणार का, या प्रश्नावर ते असेही म्हणाले की, राजकारणात पुढे काय होणार हे कुणीच सांगू शकत नाही, जसे आपण केव्हा मरू हे कुणाला माहीत नसते. मला राजकारणातून निवृत्त व्हायचे होते, पण लाखो समर्थकांसाठी मी सक्रिय आहे.
काँग्रेसचे जम्मू-काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मीर हे आझाद यांच्या बैठकांना अनुपस्थित राहिले आहेत. याविषयी छेडले असता आझाद म्हणाले की, कदाचित माझा वेग आणि क्षमतेशी ते बरोबरी करू शकत नसावेत. ४० वर्षांपूर्वी राजकीय प्रवास सुरू केला तेव्हा होती तितकीच ऊर्जा माज्याकडे आहे. मी दिवसाला १६ सभा सुद्धा घेऊ शकतो. समर्थकांनी मागणी केली असली तरी प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा नसल्याचेही आझाद यांनी स्पष्ट केले.
दोन वर्षांपूर्वी जी-२३ नावाचा गट स्थापन करून त्यामध्ये काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी पक्षनेतृत्व आणि पक्षातील कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली होती. तसेच, राहुल गांधींच्या नेतृत्वावर देखील आक्षेप घेतला होता. याच जी-२३चे एक सदस्य असलेले गुलाम नबी आझाद जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत.
गुलाम नबी आझाद यांनी यावेळी बोलताना इंदिरा गांधी-राजीव गांधी आणि काँग्रेसचं आत्ताचं नेतृत्व यांच्यात तुलना केली आहे. ते म्हणाले, नेतृत्वाला कुणीही आव्हान देत नाहीये. इंदिरा गांधी आणि राजीव गांधींनी मला काही चुकीचं घडल्यास त्यावर प्रश्न विचारण्याची मोकळीक दिली होती. त्यांचा टीकेबाबत आक्षेप नसायचा. त्यांना यात अपमान नव्हता वाटत. आज काँग्रेसमध्ये नेतृत्वाला यात अपमान वाटतो.
Senior Congress leader Ghulam Nabi Azad hints at new party, criticizes Gandhi family for insulting leadership
महत्त्वाच्या बातम्या
- आम आदमी पार्टी सोडण्यासाठी मोदी कॅबिनेटमध्ये मंत्रीपदाची ऑफर; खासदार भगवंत मान यांचा खळबळजनक दावा!!
- पंचगंगा नदीमध्ये फेस आढळून आला
- शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींनी सोडला ‘संसद टीव्ही’ शो ‘मेरी कहानी’; राज्यसभेतील निलंबनानंतर तडकाफडकी राजीनामा
- शिक्षकांच्या मोर्चावर लाठी चार्ज : उत्तर प्रदेशमधील ६९००० सहाय्यक शिक्षकांच्या शांततापूर्ण मार्गाने होणाऱ्या कॅडल मोर्चावर पोलिसांचा लाठी चार्ज