• Download App
    जेएनयूच्या पहिल्या महिला कुलगुरुपदी पुण्याच्या प्राध्यापिका शांतिश्री पंडित यांची निवड । Selection of the first woman Vice Chancellor of JNU, Professor Shantishri Pandit from Pune

    जेएनयूच्या पहिल्या महिला कुलगुरुपदी पुण्याच्या प्राध्यापिका शांतिश्री पंडित यांची निवड

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी पुण्याच्या प्राध्यापिका शांतिश्री धुलीपुडी पंडित यांची निवड झाली आहे. त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यरत आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठासाठी जवळपास वर्षभरापासून कुलगुरूंचा शोध सुरू होता. याआधी जामिया मिलिया इस्लामियाच्या प्रोफेसर नजमा अख्तर यांनी केंद्रीय विद्यापीठात पहिल्या महिला कुलगुरूचा मान मिळवला आहे. Selection of the first woman Vice Chancellor of JNU, Professor Shantishri Pandit from Pune

    शांतीश्री पंडित आणि प्राध्यापक अविनाश कुमार पांडे यांची नावे जेएनयूच्या कुलगुरूपदासाठी आघाडीवर होती. तसेच प्राध्यापक गुलशन सचदेवा यांचेही नाव घेतले जात होते. मात्र कुलगुरूपदासाठी प्राध्यापक शांतीश्री पंडित आणि अविनाशकुमार पांडे हे प्रबळ दावेदार असल्याचे मानले जात होते.



    अखेर सावीवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापिका शांतीश्री पंडित यांची निवड झाली असून त्यांनी त्या जेएनयूतूनच पी.एचडी. प्राप्त केली.
    प्राध्यापिका शांतिश्री पंडित यांचा जन्म १५ जुलै १९६२ रोजी राशियातील सेंट पिटसबर्ग येथे झाला. उच्च विभूषित डॉ. धुलीपुडी अंजनेयलू आणि प्रा. मोलामुडी आदिलक्ष्मी या यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला.

    शांतिश्री पंडित यांना मराठीसह अनेक भाषा अवगत आहेत. निरंजन बी. पंडित यांच्याशी त्यांचा विवाह झाला असून त्यांना एक मुलगी आहे.
    त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राजकारण आणि सार्वजनिक व्यवस्थापन विभागात प्राध्यापक म्हणून कार्य करत आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्याच्या प्रदीर्घ वाटचाल पाहता त्यांची नेहरू विद्यापिठाच्या कुलगुरूपदी निवड झाली आहे.

    Selection of the first woman Vice Chancellor of JNU, Professor Shantishri Pandit from Pune

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार