वृत्तसंस्था
भुवनेश्वर : ओडिशात सुरक्षा दलांनी मलकानगिरी-कोरापूट सीमेवर नक्षलवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त केला. त्याआधी दलाची नक्षलवाद्यांशी चकमकही झाली. उभय बाजूंनी दोन तास चकमक सुरू होती. मात्र आंध्र प्रदेशचा नक्षलवादी म्होरक्या सुरेश सुराणाने सुरक्षा दलाच्या हातावर तुरी देत सहकाऱ्यांसह पळ काढला. Security forces attack on naxelies in Odisha
ओडिशा पोलिस व सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी मलकानगिरी आणि कोरापूट जिल्ह्यातील बाडिली टेकड्यांच्या परिसरात नक्षलवाद्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली. येथील नक्षलवाद्यांनी दलावर गोळीबार सुरू केला. प्रत्युतरादाखल दलातील जवानांनीही गोळीबार केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत आंध्र प्रदेशातील नक्षलवादी म्होरक्या सुरेश सुराणाने साथीदारांसह पलायन केले.
त्यांच्या शोधासाठी ओडिशा-आंध प्रदेशच्या सीमेवर सुरक्षा दलाने शोधमोहिम हाती घेतली आहे. घटनास्थळावरून सुरक्षा दलांनी सहा काडतुसे, चार डिटोनटर, वॉकीटॉकी आदी जप्त केले. ओडिशा पोलिसांनी नुकतीच कोरापूट जिल्ह्यातून वाँटेड नक्षलवादी दुब्बासी शंकर उर्फ महेंदरला अटक केली होती.
Security forces attack on naxelies in Odisha
महत्त्वाच्या बातम्या
- जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदी, आदर पूनावाला, ममता बॅनर्जी यांचेही नाव
- अनिल देशमुख यांचे तत्कालिन खासगी सचिव संजीव पलांडे निलंबित, शंभर कोटींच्या प्रकरणात होते कोठडीत
- मोठी बातमी : भारताचे स्टॉक मार्केट जगातील 5वे सर्वात मोठे, BSE लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य 260 लाख कोटी रुपयांवर
- Aukus : अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाची नवीन ‘सुरक्षा युती’ची घोषणा, फ्रान्सला धक्का, तर चीनची तिन्ही देशांवर आगपाखड