वृत्तसंस्था
कुलगाम : Kashmir जम्मू-काश्मीरातील कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक सुरू आहे. बुधवारी संध्याकाळी सुरक्षा दलांनी तंगमार्ग परिसरात दहशतवाद्यांना घेरले. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे.Kashmir
आज सकाळीच बारामुल्लाच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. सैन्याने २ दहशतवाद्यांना ठार केले. इथेही शोध सुरू आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दलांना २-३ दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करताना दिसले.
याच्या एक दिवस आधी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये २७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकाचा समावेश आहे. येथेही दहशतवाद्यांचा शोध मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
Second encounter between security forces and terrorists in Kashmir, firing in Kulgam
महत्वाच्या बातम्या
- IndiGo : इंडिगोने श्रीनगरला जाणाऱ्या विमानांचे कॅन्सलेशन अन् रिशेड्यूलिंगचे शुल्क माफ केले
- Bansuri Swaraj : प्रियांकांच्या बॅग पॉलिटिक्सला बांसुरी स्वराज यांचे उत्तर, जेपीसी बैठकीला ‘नॅशनल हेराल्ड की लूट’वाली बॅग घेऊन पोहोचल्या
- Saifullah Khalid alias Kasuri : पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्ला खालिद उर्फ कसुरी कोण आहे?
- Air India : अमेरिका-चीन टॅरिफ वॉरचा एअर इंडियाला फायदा; कंपनी बोइंगची चिनी शिपमेंट खरेदी करणार