विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आयआयटी, जोधपूरने कमी किमतीतील जलशुद्धीकरण उपकरण विकसित केले आहे. राजस्थानातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये ते बसविले जाईल. पाणी शुद्ध करण्यासह त्याच्या पुनर्वापरासाठी व या उपकरणात पडदा असलेले अल्ट्राफिल्टरेशन तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
उपकरण बसविणे, चालविणे व त्याची देखभाल यात शिक्षक, विद्यार्थ्यांचाही सहभाग असेल. प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या व्यावहारिक पैलूंची ओळख करून दिली जाते. त्यामुळे, प्राथमिक स्तरावरच कौशल्य विकासाच्या दृष्टीनेही या उपकरणाची ओळख महत्त्वाची आहे. Schools in Rajasthan will now have special IIT water purification equipment, including reuse for water purification
संशोधकांनी सांगितले, की कोरोनामुळे हात धुण्यासह अन्य कारणांसाठी पाण्याचा वापर वाढत आहे. त्यामुळे, वाया जाणाऱ्या पाण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यासाठी, पाण्याच्या नेमक्या पुरवठ्याची, जल अंदाजपत्रक व परीक्षणाची गरज आहे. हे लक्षात घेऊन आयआयटी, जोधपूरचे तज्ज्ञ आपल्या कौशल्याचा वापर पाण्याचे प्रमाण व गुणवत्तेच्या गरजांकडे सर्वसमावेशक पद्धतीने पाहण्यासाठी करत आहेत.
तज्ज्ञांनी वाया जाणाऱ्या पाण्याचा पिण्याव्यतिरिक्त वापरासाठी पुनर्वापर करण्याच्या दृष्टिने हे स्वदेशी जलशुद्धीकरण उपकरण विकसित केले आहे. मनुष्यबळ लागत नसल्याने हे उपकरण किफायतशीर ठरते. देशातील एकूण जलस्रोतांपैकी केवळ दोन टक्के जलस्रोत असलेल्या राजस्थानात अशा उपकरणांमुळे हात धुण्याला प्रोत्साहन मिळण्याचा तज्ज्ञांचा विश्वास आहे.
Schools in Rajasthan will now have special IIT water purification equipment, including reuse for water purification
महत्त्वाच्या बातम्या
- लालूंच्या दोन मुलांमध्ये भाऊबंदकीची ठिणगी, एकमेंकांच्या फोटोंना काळे फासू लागले राष्ट्रीय जनता दल फुटीच्या उंबरठ्यावर
- अमरसिंह यांच्या सांगण्यावरून मुलायम सिंह यादव यांनी अखिलेश यादव यांच्याकडे सोपवली पक्षाची सूत्रे, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्याही पाया पडू नका असा चाणक्यांनी दिला होता मंत्र
- उत्तर प्रदेशात १९ हिंदूंना शुध्दीकरण करून पुन्हा घेतले हिंदू धर्मात, बंजारा बांधवांचे झाले होते जबरदस्तीने धर्मांतर
- पारदर्शकतेची कमाई, भाजपाला इलेक्ट्रोरेल बॉँडच्या माध्यामतून मिळाली २,५५५ कोटी रुपयांची देणगी