• Download App
    School certificate by post directly at home; Dombivli school shock system

    शाळेचा दाखला थेट पोस्टाने घरी ; डोंबिवलीच्या शाळेचे धक्कातंत्र ; शिक्षण फी वाढीचा पहिला बळी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरोना काळात अनेकांचे रोजगार बंद झाले आहेत. त्यामुळे नागरिक मुलांच्या शाळेची फी भरु शकत नाहीत. फी वाढ करु नका, अशी मागणी करणाऱ्या डोंबिवलीमधील एका पालकाला शाळेने मोठा झटका दिला आहे. त्याच्या मुलाचा दाखल पोस्टाने घरी पाठवून दिला.School certificate by post directly at home; Dombivli school shock system

    संबंधित व्यक्ती हा पालकांचं नेतृत्व करत असल्याने शाळेने त्या पालकाच्या मुलाला शाळेतून काढल्याचा दाखला थेट पोस्टाने घरी पाठविला आहे. विद्यार्थ्याने या घटनेचा धसका घेतला आहे. या संदर्भात लालचंद पाटील या पालकाने शिक्षणमंत्र्यांकडे शाळेची परवानगी रद्द करण्याची मागणी केली आहे.



    डोंबिवलीच्या ग्रामीण भागात असलेल्या सोनारपाडा परिसरात शंकरा नावाची शाळा आहे. या शाळेत काही दिवसांपूर्वी फी वाढविण्यात आली होती. कोरोना काळात अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.काही पालकांचा व्यवसाय बंद झाला आहे. वाढीव फी देणार कशी? असा प्रश्न पालकांसमोर आहे.

    हीच बाब लक्षात घेऊन लालचंद पाटलांनी सर्व पालकांच्या वतीने पुढाकार घेतला. फी कमी करण्यात यावी या संदर्भात शाळा प्रशासनास निवेदन दिले. इतकेच नाही तर वारंवार फी कमी करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे शाळा प्रशासनाने याचा राग काढला, असा आरोप लालचंद पाटील यांनी केला.विशेष म्हणजे पाटील यांच्या मुलाला शाळेतून काढून टाकत दाखला थेट घरी पोस्टाने पाठविला. त्या मुळे मुलाला देखील धक्काच बसला आहे.

    • शाळेची परवानगी रद्द करण्याची मागणी

    याप्रकरणी लालचंद पाटील यांनी शाळेची परवानगी रद्द करण्याची मागणी केली आहे.लालचंद पाटील यांनी शाळेच्या विरोधात शालेय शिक्षणमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे.तर या बाबत शाळा प्रशासनाने कॅमरामसोर बोलण्यास नकार दिलाय .तर या बाबत कल्याण तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी यांनी चौकशी करून या प्रकरणी कारवाई करणार असल्याचे मत स्पष्ट केले आहे

    • डोंबिवलीच्या शाळेचा दाखला थेट पोस्टाने घरी
    •  शाळेतून काढल्याने विद्यार्थ्याला बसला धक्का
    •  शिक्षण फी वाढीला विरोध केल्याने काढला वचपा
    •  पालकांचे नेतृत्व करणे पडले महागात
    •  लालचंद पाटलांचा पालकांच्या वतीने पुढाकार
    • फी कमी करण्यासाठी शाळा प्रशासनास निवेदन
    • वारंवार फी कमी करण्यासाठी पाठपुरावा केला
    • शाळा प्रशासनाला आला राग; दखलाच पाठविला
    • शाळेची परवानगी रद्द करण्याची मागणी

    School certificate by post directly at home; Dombivli school shock system

     

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही