केंद्र सरकारने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सरकारने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली आहे. हा निर्णय पुढच्या वर्षी जुलैपासून हा निर्णय लागू होईल. यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे.
पुढच्या वर्षी म्हणजेच 1 जुलै 2022 पासून सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये सिंगल यूज प्लास्टिकची निर्मिती, विक्री, साठवण तसेच वाहूतक करण्यास बंदी असेल.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशातील वाढत्या प्लास्टिक प्रदूषणावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १ जुलै २०२२ पासून, कप, प्लेट्स आणि स्ट्रॉजसारख्या सर्व वापरात असलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंच्या निर्मिती, विक्री आणि वापरावर देशात बंदी घालण्यात आली आहे. या बंदीमुळे पॉलिथीन पिशव्यांची जाडी ५० मायक्रॉनवरून १२० मायक्रॉनपर्यंत वाढवण्यात आली आहे. SAY NO TO PLASTIC: Modi government’s historic decision! From 1 July 2022 – Closure of production-sale-use of single use plastic items
पुढच्या वर्षी म्हणजेच १ जुलै २०२२ पासून सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये सिंगल यूज प्लास्टिकची निर्मिती, विक्री, साठवण तसेच वाहूतक करण्यास बंदी असेल. पर्यावरणप्रेमींनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा नियम २०२१ जारी केला आहे. याअंतर्गत वरील निर्णय घेण्यात आला आहे.
उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी
नव्या अधिनियमानुसार १ जुलै २०२२ पासून पॉलिस्टीरिन आणि विस्तारित पॉलिस्टीरिनसह सिंगल यूज प्लास्टिकच्या उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी असेल. यामध्ये प्लास्टिकच्या विविध वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. झेंडा, फुगे, आईसक्रीम आणि कँडीसाठी वापरत असलेल्या प्लास्टिकच्या काड्या, सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकॉल यांचे उत्पान करण्यात बंदी असेल. तसेच प्लेट्स, कप, ग्लासेस, स्वीट बॉक्स, इन्विटेशन कार्ड आणि सिगारेटच्या पॅकेटवरील प्लास्टिकचे रॅप अशा वस्तूंची निर्मिती करण्यासही बंदी असेल.
नव्या नियमांत काय आहे ?
नव्या नियमांनुसार येत्या ३० सप्टेंबर २०२१ पासून प्लास्टिक पिशवीची जाडी ५० मायक्रॉनवरून ७५ मायक्रॉन केली जाईल. तसेच पुढील वर्षी ३१ डिसेंबर २०२२ पासून हीच जाडी १२० मायक्रॉनपर्यंत वाढवली जाईल. सध्याच्या नियमानुसार देशात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या पिशव्यांचे उत्पादन, साठवण करण्यास बंदी आहे.
निर्णयाचे पर्यावरणप्रेमींकडून स्वागत
दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पर्यावरण संवर्धानास मोठी मदत मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारच्या या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले आहे. ठरलेल्या वेळेनुसार या सर्व नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
पॉलिथीन पिशव्यांमधील सुधारणा दोन टप्प्यात लागू करण्यात येतील. ३० सप्टेंबर २०२१ पासून पहिला टप्पा सुरू होईल. यानुसार सर्व ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घालण्यात येईल. यानंतर दुसरा टप्पा हा ३१ डिसेंबर २०२२ पासून सुरू होईल. यात १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली जाईल. देशात सध्या ५० मायक्रॉनहून कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आहे.
SAY NO TO PLASTIC : Modi government’s historic decision! From 1 July 2022 – Closure of production-sale-use of single use plastic items
महत्त्वाच्या बातम्या
- अर्थव्यवस्थेत सुधारणांचे संकेत : किरकोळ महागाई जुलैमध्ये ५.५९%, तीन महिन्यांतील सर्वात कमी; औद्योगिक उत्पादनही वाढले
- Share Market : 55 हजारी झाले सेन्सेक्स, अर्थव्यवस्था मजबुतीच्या संकेतांमुळे गुंतवणूकदारांत उत्साह
- मुंबईत डेल्टा प्लस प्रकारामुळे पहिला मृत्यू, संपर्कात आलेले इतर दोन जणही पॉझिटिव्ह, आतापर्यंत 7 रुग्णांची नोंद
- आता राहुल गांधींची फेसबुक आणि इन्स्टाग्राम खातीही लॉक होणार? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची मागणी
- ऑक्सफोर्ड लसीमुळे रक्त गोठणे अत्यंत धोकादायक आणि प्राणघातक, नव्या संशोधनात दावा