• Download App
    Pakistan इराण - अमेरिका युद्धात पाकिस्तानची मध्यस्थी की लुडबुड??; अमेरिका आणि इराण सोडून भलत्याच देशांचेच परराष्ट्र मंत्री पोहोचले पाकिस्तानात!!

    इराण – अमेरिका युद्धात पाकिस्तानची मध्यस्थी की लुडबुड??; अमेरिका आणि इराण सोडून भलत्याच देशांचेच परराष्ट्र मंत्री पोहोचले पाकिस्तानात!!

    नाशिक : इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात पाकिस्तान मध्यस्थी करत आहे की लुडबुड करत आहे??, असा सवाल आज समोर आला कारण अमेरिकेचे आणि इराणचे परराष्ट्र मंत्री सोडून इतर तीन देशांचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तानच्या इस्लामाबादेत दाखल झाले. त्याउलट उलट अमेरिकेने इराणच्या भूमीवर लढण्यासाठी अतिशय सैनिक पाठविले.

    – पाकिस्तान मध्यस्थ नव्हे, दलाल!!

    इराण आणि अमेरिका यांच्यातल्या युद्धात पाकिस्तान मध्यस्थी करू इच्छित असल्याची बातमी स्वतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ अकाउंट वरून जाहीर केली. पाकिस्तानच्या मध्यस्थी बद्दल त्यांनी समाधान सुद्धा व्यक्त केले त्यामुळे पाकिस्तानातल्या राज्यकर्त्यांना आपण फार मोठे मध्यस्थ असल्याचा भास होऊ लागला. पण भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी “दलाल” या एका शब्दातच पाकिस्तानच्या मध्यस्थीची वासलात लावली. दहशतवादाची निर्यात करणारा देश युद्ध थांबविणारा मध्यस्थ कसा काय होऊ शकतो??, असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित करून पाकिस्तानला टोचले.



    – G7 बैठकीत पाकिस्तानला निमंत्रणच नाही

    याच दरम्यान एस. जयशंकर पॅरिसमध्ये G7 प्रगत देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला पोहोचले. तिथे त्यांनी अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, कॅनडा, जपान आणि जर्मनी यांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी वाटाघाटी केल्या. या बैठकीला पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना निमंत्रणच नव्हते. कारण ही प्रगत राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची परिषद होती. फ्रान्सचे अध्यक्ष नरेंद्र मोदींचे मित्र इम्यूएल माक्रोन यांनी भारताला त्या बैठकीचे खास निमंत्रण दिले होते. या बैठकीत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो हजर होते. पण पॅरिस मध्ये ही बैठक सुरू असतानाच अमेरिकेने इराण मध्ये पायदळ पाठवून इराणच्या भूमीवर लढाई करायचा निर्णय घेतला. त्यानुसार अमेरिकेने त्रिपोली या युद्धनौकेतून अमेरिकन पायदळाचे 3500 सैनिक इराणच्या भूमीवर पाठविले. आम्ही त्यांना कब्रस्तानात पाठवू, असे इराणने जाहीर केले.

    – पाकिस्तानचे स्वप्न धुळीला

    या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची युद्धातील मध्यस्थी हवेतल्या हवेत विरली. पण सौदी अरेबिया, इजिप्त आणि तुर्कस्तानचे परराष्ट्रमंत्री इस्लामाबादेत पोहोचले. यापैकी फक्त सौदी अरेबियाला युद्धाची झळ पोहोचली, पण ज्या दोन देशांमध्ये मोठे युद्ध सुरू आहे, त्या देशांचे म्हणजेच अमेरिका आणि इराणचे परराष्ट्र मंत्री इस्लामाबाद कडे फिरकले सुद्धा नाहीत. त्यामुळे युद्धात मध्यस्थाची भूमिका बजावून मोठेपणा मिरवायचे पाकिस्तानी राज्यकर्त्यांचे स्वप्न धुळीला मिळाले.

    Saudi, Egyptian, Turkiye FMs to visit Pakistan for West Asia peace

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    DGCA : VVIP फ्लाइट्स- पायलटवर नेते दबाव टाकू शकत नाहीत; परिस्थिती ठीक नसल्यास नकार देऊ शकतात; अजित पवार विमान अपघातानंतर नियम बदलले

    c

    Bengaluru Professor : प्रोफेसरने विद्यार्थ्याला दहशतवादी म्हटले; पीडितला पाठिंबा दिल्याने इतर विद्यार्थ्यांना निलंबित केले