प्रतिनिधी
जम्मू : 2025 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आहे. हे शताब्दी वर्ष सुरू होण्यापूर्वी जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात संघ कार्यकर्त्यांनी संघकार्याचा विस्तार करून संघटनात्मक मजबुती आणण्यावर भर द्यावा, असे आवाहन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. सरसंघचालक तीन दिवसीय जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. Sarsangh leaders emphasize on expansion of union work in Jammu and Kashmir
डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी संघ स्वयंसेवकांना पर्यावरणाच्या रक्षणासाठी, सामाजिक एकोपा मजबूत करण्यासाठी आणि भारतातील पारंपारिक कुटुंब व्यवस्था मजबूत करण्यासाठी स्वयंसेवकांनी कार्य करण्याचे आवाहन केले.
जम्मू दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी डॉ. मोहन भागवत यांनी संघ परिवारातील विविध संघटनांच्या समन्वय बैठकीला संबोधित केले. संघ परिवारातील 38 संघटनांचे 105 स्वयंसेवक या बैठकीला उपस्थित होते, ज्यात विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा यासाठी संघटनेचा अधिक विस्तार करण्यावर सरसंघचालकांनी भर दिला. त्यांनी विशेषतः संघाच्या स्थापनेच्या शताब्दी समारंभाच्या आधी संस्थेचा कार्यविस्तार करण्यावर भर दिला.
या समन्वय बैठकीत सरसंघचालकांनी जम्मू आणि काश्मीर रा. स्व. संघाच्या वतीने खेडी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी सुरू केलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. ग्रामविकास आणि समाजात सामाजिक समरसता निर्माण करणारे प्रकल्प हाती घेतलेल्या स्वयंसेवकांना त्यांनी काही सूचना केल्या.
या व्यग्र वेळापत्रकात सरसंघचालकांनी केशव भवन येथे सेवा भारतीच्या वसतिगृहात राहणाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सरसंघचालकांसमोर देशभक्तीपर गीते गायली.
क्षेत्र संघचालक सीतारामजी व्यास आणि जम्मू-काश्मीर प्रांताचे संघचालक डॉ. गौतम मेंगी हेही मंचावर उपस्थित होते.
Sarsangh leaders emphasize on expansion of union work in Jammu and Kashmir
महत्वाच्या बातम्या
- सुप्रिया सुळे यांची वैयक्तिक डायरी की महाराष्ट्राच्या आत्मपॅम्फ्लेटची तयारी??
- नितीश कुमारांना मोठा धक्का, ‘JDU’प्रदेश उपाध्यक्ष लालन पासवान यांचा राजीनामा
- हमासशी आरपारच्या मूडमध्ये अमेरिका! मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा पाठवल्यानंतर आता परराष्ट्रमंत्री इस्रायलला पोहोचले
- पेटीएम पेमेंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेने दिला दणका, 5.39 कोटींचा दंड; जाणून घ्या कारण