विशेष प्रतिनिधी
नागपूर : भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ( Sarsangchalak Mohan Bhagwat ) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांनी बांगलादेशातील हिंदूंबाबत मोठे विधान केले आहे. बांगलादेशातील हिंदू बांधवांना त्रास होऊ नये, हे पाहणं एक देश म्हणून आपली आणि सरकारची जबाबदारी आहे असे ते म्हणाले आहेत. तसेच सरकार हे करेलच, मात्र त्यासाठी देशाच्या नागरिकांचा पाठिंबाही आवश्यक आहे, असे ते म्हणाले आहेत.
1857 पासून हा स्वातंत्र्याचा लढा सुरू होता
यावेळी देशातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना ते म्हणाले, ”देशासाठी चिंतन करण्याचा आजचा दिवस आहे. पण फक्त चिंतन करून चालणार नाही. 1857 पासूनच्या संघर्ष चालला, त्यानंतर आपण स्वातंत्र्य मिळवले. त्यामुळे स्वातंत्र्याच्या नायकांची मोठी संख्या आहे. त्यात अहिंसक आंदोलनापासून क्रांतिकारक यांचा समावेश आहे. मात्र, हेच नायक देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले. तर सामान्य नागरिक ही तेव्हा देशासाठी रस्त्यावर उतरले होते. प्रत्येकाने वाटा उचलला. देशासाठी बलिदान करणारा समूह आणि त्यांच्या पाठीशी उभा असलेला समाज या कारणामुळेच आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळवून देणारी पिढी तर निघून गेली, मात्र आजच्या पिढीवर स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे”, असेही त्यांनी म्हटलं आहे.
भारताने कधी कोणावर आक्रमण केले नाही
तर यावेळी त्यांनी बांगलादेशातील स्थितीवर महत्त्वाचे भाष्य केले आहे. ते म्हणाले, ”बांगलादेशातील हिंदू बांधवांना त्रास होऊ नये, हे पाहणं एक देश म्हणून आपली आणि सरकारची जबाबदारी आहे. सरकार हे करेलच, मात्र त्यासाठी देशाच्या नागरिकांचा पाठिंबा ही आवश्यक आहे, असे ते म्हणाले. तसेच शेजारील देशात उत्पात होत आहे. तेथील हिंदू बांधवांना त्याचा त्रास होत आहे. भारताने कधी कोणावर आक्रमण केले नाही, संकटात असलेल्यांना कायमच मदत केली. मग संकटात असलेला तो देश आपल्याशी कसे वागला हे भारताने पाहिले नाही, गरजेच्या काळात भारताने कायमच मदत केली”,असे ते म्हणाले.
देशात योग्य वातावरण निर्माण करणे सर्वांची जबाबदारी
तसेच पुढे ते म्हणाले, ”देशात योग्य वातावरण निर्माण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जीवनातील छोट्या छोट्या समस्यांचे उपाय शोधले पाहिजे. देशाची रक्षा करण्यासाठी सतत सजग राहावे लागते. संविधानिक अनुशासनाचे पालन करावे लागते. परिस्थिती नेहमी सारखी राहत नाही”, असेही ते म्हणाले.
Sarsangchalak Mohan Bhagwat Speech On Independence day Nagpur
महत्वाच्या बातम्या
- Narendra Modi : विकसित भारताचा संकल्प ते वैद्यकीय शिक्षणाच्या वाढीव 75000 जागा; लाल किल्ल्यावरून काय म्हणाले मोदी??; वाचा!!
- Sheikh Hasina : पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतरही शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ
- Govind Mohan : वरिष्ठ आयएएस अधिकारी गोविंद मोहन यांची केंद्रीय गृहसचिव म्हणून नियुक्ती!
- Vinesh Phogat : CASने विनेश फोगटची केस फेटाळली, रौप्य पदक मिळणार नाही!