वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वावर संक्रांत आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दू यांचा कँप जोरात असून आज सायंकाळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होत आहे. यात काँग्रेसचे आमदार उघडपणे नेतृत्वबदलाची मागणी उचलून धरण्याची शक्यता आहे. Sankrant on Capt. Amarinder Singh in Punjab; Evening meeting of the Congress Legislative Party; Navjyot Sidhu Camp in full swing
काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने देखील कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या उचलबांगडीसाठी राजकीय व्यूहरचना केली आहे. काँग्रेसचे पंजाब प्रभारी हरिष रावत हे अजय माकन आणि हरिष चौधरी या नेत्यांसह पक्षाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून चंडीगडमध्ये होणाऱ्या बैठकीत सहभागी होणार आहेत. काँग्रेसच्या ४० आमदारांनी पक्षनेतृत्वाकडे पंजाबच्या मुख्यमंत्रीपदात बदल करण्याची मागणी केली आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनाही या बंडखोरीची पुरती जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी देखील आपल्या कँपची तयारी पूर्ण केली आहे. ते कदाचित आजच्या सायंकाळच्या बैठकीपूर्वीच काही राजकीय धमाका करू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व जर आपल्याला धडा शिकविण्याच्या बेतात असेल, तर आपणही काही कमी नाही, हे कॅप्टन अमरिंदर सिंग पक्ष नेतृत्वाला दाखवून देतील, असे त्यांच्या कँपमधल्या सूत्रांनी सांगितले.
Sankrant on Capt. Amarinder Singh in Punjab; Evening meeting of the Congress Legislative Party; Navjyot Sidhu Camp in full swing
महत्त्वाच्या बातम्या
- शशी थरुरना गाढव म्हटल्याबद्दल तेलंगण काँग्रेस प्रदेशाध्यक्षाकडून माफी
- काश्मिरी पंडितांचे काश्मीर खोऱ्यात पुनर्वसन करण्यासाठी मोदी सरकारचे महत्त्वाचे पाऊल
- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली चार धाम यात्रा आजपासून सुरु
- India Vaccination : कोरोना लसीकरणात भारताने मोडला चीनचा ऐतिहासिक विक्रम, रात्री साडे नऊपर्यंत 2.25 कोटी डोस दिले