• Download App
    Sanjay Raut - BJP : संजय राऊतांचे पुन्हा केंद्रीय तपास संस्थांवर टीकास्त्र; पण आज 14 मार्चला एक महिना उलटूनही भाजपचे साडेतीन नेते बाहेरच!! । Sanjay Raut - BJP: Sanjay Raut again castigates Central Investigation Agency; But today, on March 14, even after a month, three and a half BJP leaders are out !!

    Sanjay Raut – BJP : संजय राऊतांचे पुन्हा केंद्रीय तपास संस्थांवर टीकास्त्र; पण आज 14 मार्चला एक महिना उलटूनही भाजपचे साडेतीन नेते बाहेरच!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रीय तपास संस्थांना महाराष्ट्राचे टार्गेट दिले आहे, अशा शब्दांमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. पण भाजप से साडेतीन ते तुरुंगात जातील असे संजय राऊत 14 फेब्रुवारी रोजी म्हणाले होते, त्याला आज 14 मार्च रोजी बरोबर एक महिना झाला, तरी हे साडेतीन नेते अजूनही बाहेरच असल्याचे दिसून येत आहे…!! याचा खुलासा मात्र संजय राऊत यांना विचारण्यात आला नाही. त्यामुळे त्यांनी तो केला नाही. Sanjay Raut – BJP: Sanjay Raut again castigates Central Investigation Agency; But today, on March 14, even after a month, three and a half BJP leaders are out !!

    नवी दिल्लीत आपल्या दैनंदिन पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जोरदार स्तुती केली. पण त्याच वेळी भाजपच्या नेत्यांवर त्यांनी टीकास्त्र सोडले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची उंची फार मोठी आहे. ते देशाचे पंतप्रधान आहेत. परंतु, भाजपच्या नेत्यांनी त्यांची उंची गुडघ्या पेक्षा कमी करून ठेवली आहे. त्यांना भाजपचे पंतप्रधान करून ठेवले आहे. भाजपपेक्षाही भाजप मधल्या एका गटाचे पंतप्रधान करून ठेवले आहे. स्वतः नरेंद्र मोदी यांनी समजून घेतले पाहिजे की आपण देशाचे पंतप्रधान आहोत, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली. त्याच वेळी त्यांनी सध्या केंद्रीय तपास संस्थांना महाराष्ट्राचे टार्गेट देण्यात आले आहे असे टीकास्त्र सोडले.


    Raut – Raj : संजय राऊत यांचा “एकांत” ते तुरुंगातली पत्रकार परिषद; मनसेचे तिखट वार सुरूच!!


    – 14 फेब्रुवारी ते 14 मार्च

    पण संजय राऊत यांनी गेल्या महिन्यात बरोबर 14 फेब्रुवारी रोजी भाजपचे साडेतीन नेते तुरुंगात जातील. लवकरच आपण त्यांची नावे सांगू असे जाहीर केले होते. त्यानंतर शिवसेना भवनात घेतलेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत त्यांनी नील सोमय्या, किरीट सोमय्या यांची नावे घेतली होती. पण भाजपचे साडेतीन नेते कोण हे मात्र गुलदस्त्यात ठेवले होते. त्यानंतर देखील संजय राऊत यांची शिवसेना भवनात पत्रकार परिषद झाली. तेव्हा खासदार अरविंद सावंत त्यांच्या समवेत होते. पण त्यावेळी देखील त्यांनी भाजपचे साडेतीन नेते कोण त्याचा खुलासा केला नाही. आज या गोष्टीला बरोबर 14 मार्च रोजी एक महिना पूर्ण झाला तरी भाजपचे साडेतीन नेते नेमके कोण आणि ते अद्याप बाहेर का? याचा खुलासा झालेला नाही. त्यांच्या संजय राऊत यांच्या दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना या मुद्द्याचे आठवण करून दिली नाही. त्यामुळे संजय राऊत यांनी त्या मुद्द्यावर उत्तरही दिले नाही.

    – अनिल देशमुख, नवाब मलिक तुरूंगात

    पण या महिनाभराच्या काळात ठाकरे – पवार सरकारचे मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक या मंत्र्यांना मात्र तुरुंगाची हवा खावी लागली आहे. ते अद्यापही कोठडीत बसलेले आहेत. मात्र, संजय राऊत यांनी उच्चार केलेले भाजपचे साडेतीन नेते अद्याप बाहेरच आहेत.

    Sanjay Raut – BJP : Sanjay Raut again castigates Central Investigation Agency; But today, on March 14, even after a month, three and a half BJP leaders are out !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट