• Download App
    समीर वानखेडे यांची मुदत 31 डिसेंबरला संपणार; मुदतवाढ मागितली नाही; नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची माहिती | Sameer Wankhede's term ends on December 31; Did not ask for an extension; Information from the Bureau of Narcotics Control

    समीर वानखेडे यांची मुदत ३१ डिसेंबरला संपणार; मुदतवाढ मागितली नाही; नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची माहिती

    वृत्तसंस्था

    मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची मुदत 31 डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यांनी मुदतवाढ मागितलेली नाही, अशी माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दिली आहे.Sameer Wankhede’s term ends on December 31; Did not ask for an extension; Information from the Bureau of Narcotics Control

    समीर वानखेडे यांच्या कारकिर्दीचा आढावा देखील ब्युरोने घेतला आहे. समीर वानखेडे यांनी ऑगस्ट ते डिसेंबर 2020 दरम्यान 28 केसेस रजिस्टर केल्या आणि 96 गुन्हेगारांना अटक केली, तर 2021 मध्ये मटका 17 डिसेंबर पर्यंत समीर वानखेडे यांनी 117 केसेस दाखल केल्या



    आणि 234 गुन्हेगारांना अटक केली. त्यांनी तब्बल 1000 कोटी रुपयांची 1791 किलो ड्रग्स जप्त केली तर 11 कोटी रुपयांचा मालमत्ता गोठवली. ही तपशीलवार माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दिली आहे.

    समीर वानखेडे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मध्ये नेहमीच धडाडीचे अधिकारी म्हणून ओळखले गेले. आर्यन खान क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात ते अधिक चर्चेत आले. त्याआधी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना 200 किलो गांजा प्रकरणी जप्त करून अटक केली. सध्या समीर खान जामिनावर सुटला असून त्याच्या जामिनावर विरुद्ध नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो उच्च न्यायालयात गेले आहे.

    समीर वानखेडे यांच्या विरोधात नवाब मलिक यांनी आर्यन खान केस नंतर मोठ्या प्रमाणावर मोहीम उघडली. त्यांच्या धर्मावरून देखील मोठ्या प्रमाणावर वाद उत्पन्न झाला. आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाया संदर्भात तपशीलवार माहिती देऊन त्यांची मुदत 31 डिसेंबर रोजी संपत आहे आणि त्यांनी मुदतवाढ मागितलेली नाही, असे स्पष्ट केले आहे.

    Sameer Wankhede’s term ends on December 31; Did not ask for an extension; Information from the Bureau of Narcotics Control

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही