• Download App
    राहुल गांधी यांच्या रोजच्या ट्विटमुळे कोरोना जाणार नाही – संबित पात्रा यांची टीका Sambit Patra targests Rahul Gandhi

    राहुल गांधी यांच्या रोजच्या ट्विटमुळे कोरोना जाणार नाही – संबित पात्रा यांची टीका

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या रोजच्या ट्विटमुळे कोरोना जाणार नाही. त्यांना काहीही कळत नाही आणि साऱ्या विषयावर त्यांना बोलायचे असते अशी टीका भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी कली आहे. Sambit Patra targests Rahul Gandhi

    ते म्हणाले, शतकातून एकदाच येणारे संकट घालवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करायचे असते, जे राहुल गांधी यांनी कधीही केलेले नाही. रोज सकाळी ट्विट करणे आणि पंतप्रधानांवर टीका करणे यापेक्षा त्यांनी महाराष्ट्रासह इतर काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दडपेगिरीबद्दलची विचारणा करावी.



    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात मृत्युमुखी पडणाऱ्या लाखो दुर्दैवी लोकांची आकडेवारी आणि वास्तविक परिस्थिती यात फरक असेल तर महाराष्ट्र, राजस्थानसह काँग्रेसशासित राज्यांनी त्यांच्याकडील मृतांचे खरे आकडे लपविले हाच अर्थ होतो. तसेच जी राज्ये पुरेशी लस मिळत नसल्याची ओरड करतात त्यांनी केंद्राकडून मोफत मिळालेल्या लसमात्रांचे व्यवस्थापन नीट होईल याची दक्षता घ्यावी, अशीही सूचनाही त्यांनी केली.

    Sambit Patra targests Rahul Gandhi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न

    RBI New Guidelines 2026 : कर्ज वसुली एजंट आता ग्राहकांना त्रास देऊ शकणार नाहीत; RBI कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणणार