विशेष प्रतिनिधी
लखनऊ : निवडणुकीचे निकाल लागल्यावर ईव्हीएम मशीनवर (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) आरोप केले जातात. मात्र, समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यापासूनच ईव्हीएमवर आरोप करायला सुरूवात केली आहे. समाजवादी पक्षाला आत्तापासूनच पराभवाचा अंदाज आला का? असा सवाल केला जात आहे.Samajwadi Party’s radar starts from now, allegations against EVM machine start from the third phase of elections
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. राज्यातील १६ जिल्ह्यांतील ५९ जागांसाठी मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान समाजवादी पक्षाने ट्विट करून निवडणूक आयोगाकडे तक्रार करत अनेक जागांवर गडबड झाल्याचा आरोप केला आहे. समाजवादी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक-दोन नव्हे तर सुमारे १५० तक्रारी ट्विट करण्यात आल्या आहेत.
समाजवादी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आरोप करणारे पहिले ट्विट सकाळी ८.०३ वाजता करण्यात आले. समाजवादी पक्षाच्या ट्विटर हँडलवरून काही वेळातच १२० हून अधिक ट्विट करण्यात आले आहेत. या ट्विटमध्ये राज्यातील ५९ जागांवरील मतदानादरम्यान मतदान केंद्रांवर गडबड झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कानपूर ग्रामीण भागातील भोगनीपूर मतदारसंघातील मतदान क्रमांक १२१ वर सायकलच्या चिन्हाचे बटण दाबल्यावर भाजपची स्लिप बाहेर येत आहे. निवडणूक आयोगाने दखल घेऊन सुरळीत आणि निष्पक्ष मतदानाची खात्री करावी, असा आरोप समाजवादी पक्षाने एका ट्विटमध्ये केला आहे. भोगनीपूर उपजिल्हाधिकाºयांनी याची दखल घेतली.
ट्विटरच्या माध्यमातून आरोपाचा इन्कार केला. विधानसभा मतदारसंघा २०८ मधील मतदान क्रमांक १२१ मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही. मतदान केंद्रावरील मतदान सुरळीत आणि निष्पक्ष सुरू आहे. मशिन्समध्ये कोणतीही अडचण नाही, असे त्यांनी सांगितले. त्याचवेळी कानपूरच्या जिल्हाधिकारी नेहा शर्मा यांनीही माहिती दिली. आतापर्यंत अशी तीन प्रकरणे समोर आली आहेत ज्यात मतदानाची गोपनीयता भंग झाली आहे. आम्ही तिन्ही प्रकरणांमध्ये कारवाई केली आहे, असे त्यांनी सांगितले.
मैनपुरी जिल्ह्यातील करहल मतदारसंघातल्या मतदान क्रमांक ३१९, ३२० वर भाजप उमेदवार एसपी सिंह बघेल हे पोलिंग पार्टीला धमकावत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे, निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाने कृपया याची दखल घेऊन निष्पक्ष व भयमुक्त निवडणुका घ्याव्यात,
असा दावा आणखी एका आणखी एका ट्विटमध्ये करण्यात आला होता. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव स्वत: करहल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांना कडवी टक्कर देण्यासाठी भाजपने केंद्रीय मंत्री आणि आग्राचे खासदार एसपी सिंह बघेल यांना येथून उमेदवारी दिली आहे.
Samajwadi Party’s radar starts from now, allegations against EVM machine start from the third phase of elections
महत्त्वाच्या बातम्या
- केसीआर – पवार भेट : विरोधी ऐक्याची पुढची बैठक हैदराबादेत की बारामतीत??; काँग्रेससह की काँग्रेस वगळून??
- PUNJAB : मतदान केंद्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न – Sonu Soodची कार पोलिसांनी केली जप्त ; घरा बाहेर पडल्यास केली जाणार कारवाई!
- मोठी बातमी : कोरोना रुग्णांतील घट लक्षात घेऊन निवडणूक आयोगाचा निर्णय, विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारकांच्या संख्येत वाढ
- SARTHI : शिवसेना खासदाराच्या सूनबाई बनल्या संभाजी राजांच्या सारथी ….चर्चा तर होणारच.. कौतुक-नवल…व्हिडिओ व्हायरल