विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: भाजपने समाजवादी पक्षाला ‘अल्पसंख्याक तुष्टीकरणाचा मित्र’ आणि ‘समाजविघातक’ संबोधत, या पक्षाचा २००८च्या अहमदाबाद बॉम्बस्फोटातील दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला.Samajwadi Party had links with terrorists in 2008 Ahmedabad blasts, Union Minister Anurag Thakur alleges
ठाकूर यांनी भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन एक छायाचित्र दाखवले. यात अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणातील एका आरोपीचे वडील समाजवादी पक्ष प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत दिसत होते. यावरून समाजवादी पक्षाचा या बॉम्बस्फोटातील सूत्रधारांशी संबंध असल्याचा आरोप ठाकूर यांनी यावेळी केला.
ते म्हणाले, भाजपने नेहमीच दहशतवादाला तीव्र विरोध केला आहे. मात्र, समाजवादी पक्ष दहशतवादी कारवायांमध्ये सामील असलेल्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटांचा थेट संबंध या पक्षाच्या उत्तर प्रदेशातील नेत्यांशी होता. याप्रकरणी अखिलेश यांनी उत्तर द्यावे.
दरम्यान, अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष न्यायालयाने शुक्रवारीच इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या ३८ दहशतवाद्यांना फाशी आणि ११ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या स्फोटात ५६ नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर २००हून अधिक जण जखमी झाले होते.
Samajwadi Party had links with terrorists in 2008 Ahmedabad blasts, Union Minister Anurag Thakur alleges
महत्त्वाच्या बातम्या
- दंगल गर्ल झायराने केला हिजाब बंदीचा निषेध, हिजाब परिधान करणारी स्त्री देवाने तिच्यावर दिलेले दायित्व करते पूर्ण
- बाबा राम रहीमचे 40 लाख अनुयायांना भाजपला मत देण्याचे फर्मान?; आज रात्री होणार कोडवर्ड; “भास्कर”च्या बातमी दावा!!
- मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात गुजरात हायकोर्टात जनहित याचिका; गुजरात सरकारला कोर्टाची नोटीस
- लावण्याला न्याय मिळवून देण्यासाठी अभाविप कटिबद्ध, बळजबरी धर्मांतराच्याच्या विरोधात छात्रशक्ती देशभरात रस्त्यावर उतरेल – अभाविप