• Download App
    ममतांच्या "खेला होबे"ची अखिलेशकडून कॉपी; उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचे "काम होगा" प्रचारगीत लॉन्च Samajwadi Party chief Akhilesh Yadav releases his party's song 'Kaam Hoga' for 2022 assembly polls.

    ममतांच्या “खेला होबे”ची अखिलेशकडून कॉपी; उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचे “काम होगा” प्रचारगीत लॉन्च

    वृत्तसंस्था

    लखनऊ : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीत “खेला होबे” ही घोषणा लोकप्रिय केली होती. “खेला होबे” म्हणजे भाजपचा आता खेळ होणार. म्हणजे खेळ संपणार. या घोषणेने ममता बॅनर्जी यांना चांगलाच हात दिला होता. Samajwadi Party chief Akhilesh Yadav releases his party’s song ‘Kaam Hoga’ for 2022 assembly polls.

    आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जी यांच्या “खेला होबे” घोषणेची कॉपी मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीचे “काम होगा” हे गाणे लॉन्च केले आहे. योगी सरकारवर कडाडून टीका आणि वाभाडे, तर अखिलेश यादव यांची भलामण ही या गाण्याची थीम आहे.
    अखिलेश यादव यांनी परवाच माजी केंद्रीय मंत्री जनेश्वर मिश्र यांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या सायकल रॅलीत अजब दावा केला होता. उत्तर प्रदेशात योगी सरकार विरोधात इतके जबरदस्त वातावरण आहे की समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी झटून काम केले तर 403 पैकी 400 जागा जिंकून आणता येतील, असे अखिलेश यादव म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी समाजवादी च्या पार्टीच्या प्रचारासाठी ममता बॅनर्जी यांच्या केला हो गये घोषणेची कॉफी मारून “काम होगा” हे गाणे लॉंच केले आहे.

    Samajwadi Party chief Akhilesh Yadav releases his party’s song ‘Kaam Hoga’ for 2022 assembly polls.

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते