• Download App
    5000 गरीब मजुरांशी शेक हँड केल्यानंतर राजीव गांधींचा हात कापल्याने रक्त आले; या वक्तव्यानंतर सॅम पित्रोदा सोशल मीडियात झाले ट्रोल Sam Pitroda says Rajiv Gandhi's palm once bled after shaking hands with 5,000 people, BJP mocks

    5000 गरीब मजुरांशी शेक हँड केल्यानंतर राजीव गांधींचा हात कापल्याने रक्त आले; या वक्तव्यानंतर सॅम पित्रोदा सोशल मीडियात झाले ट्रोल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या निर्घृण हत्येनंतर झालेल्या शीख विरोधी दंगलीत हजारो शिखांचे प्राण गेले पण त्यावर “हुआ तो हुआ” अशी संवेदनाहीन टिप्पणी करणाऱ्या सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा अशीच हलक्या दर्जाची टिप्पणी केली आहे. 5000 गरीब मजुरांशी शेक हँड केल्यानंतर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा हात कापला आणि त्यातून रक्त आले, असे वक्तव्य सॅम पित्रोदा यांनी केले. त्यांना सोशल मीडिया अनेकांनी ट्रोल केले आहे. Sam Pitroda says Rajiv Gandhi’s palm once bled after shaking hands with 5,000 people, BJP mocks

    राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारीपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर गांधी परिवाराचा गरिबांशी किती लगाव आहे, याचे वर्णन करताना सॅम पित्रोदा यांनी राजीव गांधींची आठवण सांगितली. ते म्हणाले, एकदा मी आणि माझी पत्नी त्यांच्याकडे भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांच्या हातातून रक्त गळताना आम्ही पाहिले. मी त्यांना विचारले हे काय झाले?, त्यावेळी ते म्हणाले, मी किमान 5000 गरीब मजूर, शेतकरी यांच्याशी शेक हँड केला. त्यांचे हात राठ असतात आणि मला त्यांच्याबरोबर शेक हँड करायला लागल्याने माझ्या हातातून रक्त गळत आहे. राजीव गांधींच्या हवाल्याने सॅम पित्रोदा यांनी ही आठवण आज सांगितली.

    मात्र सोशल मीडियात त्यामुळे ते चांगलेच ट्रोल झाले. अनेकांनी मुळात राजीव गांधींनी गरिबांशी शेक हँड केला हे पण मनापासून पटतच नाही, असे म्हटले, तर गरिबांचे हात राठ असतात हे असे बोलून तुम्ही त्यांना हिणवता का??, असा सवाल अनेकांनी केला आहे.



    – वादग्रस्त वक्तव्यांची मालिका

    अर्थात सॅम पित्रोदा यांचे हे पहिलेच वादग्रस्त वक्तव्य नाही. या आधी त्यांनी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीतल्या शीख दंगलीत हजारो शीख मारले गेले त्यावरून “हुआ तो हुआ” असे म्हटले होते.

    अयोध्यातील राम मंदिरा बाबत त्यांनी देखील त्यांनी अशीच टिप्पणी केली होती. पूर्ण देश आता रामभरोसे झाला आहे. देशातली लोकशाही कमजोर करणे चालू आहे आणि लोकांचे त्याकडे लक्ष जाऊ नये म्हणून राम मंदिराचे गाजर लोकांपुढे ठेवले जात आहे, असे सॅम पित्रोदा म्हणाले होते.

    त्यानंतर आता राजीव गांधींनी मजुरांशी शेक हँड केल्यानंतर त्यांच्या हातातून रक्त आल्याचे सॅम पित्रोदा म्हणाले आहेत.

    या प्रत्येक वेळी सोशल मीडियात सॅम पित्रोदा ट्रोल झाले, पण त्यांच्या वक्तव्यात सुधारणा झालेली नाही.

    Sam Pitroda says Rajiv Gandhi’s palm once bled after shaking hands with 5,000 people, BJP mocks

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Kangana Ranaut : तरुणांना राष्ट्रपतींचे नाव सांगता न आल्याने कंगना रनोट संतापल्या; युद्ध नव्हे टोळांसारखा मेंदू असलेली पिढी नक्कीच नाश करेल!

    Air Marshal : इंडियन आर्मीचा पाकला सज्जड दम; एअरस्ट्राइकवर एअर मार्शल म्हणाले- आमचे कवच कायम सक्रिय

    Pakistani Army Chief : पाकिस्तानी लष्करप्रमुख म्हणाले- देशाला दिलेले वचन पूर्ण केले; भारतीय सैनिक आम्हाला घाबरवू शकत नाहीत