• Download App
    आठवडाभरात रशियाची स्पुटनिक लस भारतीयांना मिळणारल लसीकरणाला येणार वेग|Russias sputnik vaccine came to India

    आठवडाभरात रशियाची स्पुटनिक लस भारतीयांना मिळणार लसीकरणाला येणार वेग

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : येत्या आठवड्यात रशियाची स्पूटनिक लस भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी याबाबत माहिती दिली असून पुढील आठवड्यापासून नागरिक स्पूटनिक लस घेऊ शकतील, असे म्हटले आहे.Russias sputnik vaccine came to India

    जुलैपासून भारतात स्पूटनिक लशीची निर्मिती होणार आहे.ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत लशीची उपलब्धता पाहता एकूण २१६ कोटी डोस मिळण्याची आशा आहे.



    यात ५५ कोटी डोस कोव्हॅक्सिनचे, ७५ कोटी डोस कोव्हिशिल्डचे, ३० कोटी डोस बायो इ सब यूनिट लशीचे, ५ कोटी डोस जायडस कॅडिला डीएनचे, २० कोटी डोस नोव्हॅक्सिनचे, १० कोटी डोस डोस भारत बायोटेक नेजल लसीचे, ६ कोटी डोस जिनोवाचे आणि १५ कोटी डोस स्पुटनिकचे असतील. याशिवाय अन्य डोस देखील भारतात दाखल होणार आहे.

    पॉल म्हणाले, की भारतात स्पूटनिक लशीचे डोस पोचले असून आणि येत्या आठवड्यात नागरिकांसाठी ही लस उपलब्ध होईल, अशी आशा आहे.

    रशियाकडून मर्यादित संख्येत आालेल्या लशींची विक्री केली पुढच्या आठवड्यात सुरू होईल. ते म्हणाले की, देशात अधिकाधिक लस उपलब्ध करण्यासाठी प्रत्येक पातळीवर काम केले जात आहे.

    Russias sputnik vaccine came to India

     

    Related posts

    RBI Report FY25, : देशात आता 2.51 लाख ATM; वर्षभरात 2,360 ATM बंद; डिजिटल पेमेंट वाढल्याचा परिणाम

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष