• Download App
    RSS chief Mohan Bhagwat प्रचंड राजकीय धकाधकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत मोदींच्या भेटीला; दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा, पण नेमके गूढ काय??

    RSS chief Mohan Bhagwat प्रचंड राजकीय धकाधकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत मोदींच्या भेटीला; दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा, पण नेमके गूढ काय??

    नाशिक : पहलगाम हल्ल्यानंतर देशात सुरू असलेल्या प्रचंड राजकीय धकाधकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे 7, लोककल्याण मार्ग या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीला पोहोचले. मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली. भागवत – मोदी भेटी आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि सैन्य दलाच्या चारही प्रमुखांची अतिशय महत्त्वपूर्ण बैठक घेतली. भारतीय सैन्य दलाला मोदींनी संपूर्ण स्वातंत्र्य बहाल केले. पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ, नेमके टार्गेट आणि कारवाईची मोडस ऑपरेंडी सैन्य दलांनीच ठरवावी. त्याची पूर्ण मोकळीत सैन्य दलांना आहे. त्यामुळे कुठलाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही, अशी ग्वाही मोदींनी देशवासियांना दिली. त्यामुळे संपूर्ण देशात एक वेगळे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.
    या पार्श्वभूमीवर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी त्यांना भेटायला गेले. देशावरच्या संकट काळात आणि प्रचंड राजकीय धकाधकीच्या वेळात भारतातले सर्वांत महत्त्वाचे हे दोन नेते एकमेकांना भेटले. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचे कुठलीही तपशील बाहेर आले नाहीत, तरी देखील दोघांच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीतून आणि अनुभवातून हे दोघे अत्यंत महत्त्वाच्या संकट काळात काय बोलले असतील??, याचा अंदाजाने कयास बांधता येऊ शकेल.

    नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच सरसंघचालक मोहन भागवत पंतप्रधान यांच्या निवासस्थानी गेले असावेत. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा रेशीम बागेमध्ये आले होते. तिथे त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना आदरांजली अर्पित केली होती. त्यावेळी प्रसार माध्यमांनी वेगवेगळ्या बातम्यांची पतंगबाजी केली होती. पण मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांची “पॉलिटिकल आणि सोशल केमिस्ट्री” किती वेगळी आहे, याबद्दल क्वचितच कोणी बोलले अथवा लिहिले होते.
    या सगळ्या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांनी पंतप्रधानांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेण्याला निश्चितच विशिष्ट महत्त्व आहे. पण संघाची कार्यपद्धती आणि सध्याच्या पंतप्रधानांची कार्यपद्धती ही एकमेकांशी सुसंगत असल्याने दोन्ही नेत्यांमधली चर्चा आणि तिचे तपशील बाहेर आले नाहीत. म्हणून या चर्चेचे महत्त्व इतर कुठल्याही चर्चांपेक्षा सर्वाधिक आहे, याविषयी शंका बाळगायचे कारण नाही.
    लालबहादूर शास्त्री – गुरुजी चर्चा
    अर्थात देशाच्या संकटकाळात पंतप्रधानांची भेट घेणारे मोहन भागवत हे काही पहिलेच सरसंघचालक नाहीत. 1965 च्या युद्धाच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी त्यावेळचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना विचार विनिमय करण्यासाठी दिल्लीला सर्वपक्षीय बैठकीत पाचरण केले होते. गुरुजींनी त्या बैठकीत सहभागी होऊन आपले विचार व्यक्त केले होते. त्याचबरोबर देशाच्या संकट काळात सरकारला सहकार्य केले होते.
    आता देखील मोदी आणि भागवत यांच्यात अशाच सहकार्याविषयी चर्चा झाली असणार किंबहुना त्यापेक्षाही अधिक काही घडले असणार, असाही कयास बांधता येऊ शकतो. त्यामुळे या चर्चेचे सकारात्मक परिणाम बाहेर दिसतील, पण हे दोन्ही नेते त्याविषयी जाहीरपणे बोलायची शक्यता नाही. कारण त्यांच्या कार्यपद्धतीत तसे बसत नाही.

    RSS chief Mohan Bhagwat meet PM Modi at 7 Lkm in this critical juncture

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rajasthan government : पाकिस्तानी हॅकर्सनी राजस्थान सरकारची वेबसाइट हॅक केली; धमकीचा संदेश लिहिला

    मोदी तिकडे पाकिस्तानला कायमचा धडा शिकवायच्या बेतात; पवार इकडे दहशतवाद्यांच्या धर्मांधतेच्या चिखलात!!

    Pahalgam attack : पहलगाम हल्ल्याच्या तणावादरम्यान सैन्यात मोठे बदल; नर्मदेश्वर वायूदलाचे उपप्रमुख; लेफ्टनंट शर्मा उत्तरी लष्कराचे कमांडर