• Download App
    पश्चिम बंगालमधील रोड शोवर निवडणूक आयोगाची बंदी, सभेसाठीही 500 लोकांचीच परवानगी । Road show in West Bengal banned by Election Commission, only 500 people allowed for Rallies

    पश्चिम बंगालमधील रोड शोवर निवडणूक आयोगाची बंदी, सभेसाठीही 500 लोकांचीच परवानगी

    Election Commission : कोरोना महामारीच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये रोड शो करणाऱ्या राजकीय पक्षांना बंदी घातली आहे. एवढेच नव्हे तर यापुढे 500 हून अधिक जण जाहीर सभांना उपस्थित राहू शकणार नाहीत. यापूर्व कोलकाता हायकोर्टाने कोरोना प्रोटोकॉलबाबत निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त केली होती. Road show in West Bengal banned by Election Commission, only 500 people allowed for Rallies


    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : कोरोना महामारीच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये रोड शो करणाऱ्या राजकीय पक्षांना बंदी घातली आहे. एवढेच नव्हे तर यापुढे 500 हून अधिक जण जाहीर सभांना उपस्थित राहू शकणार नाहीत. यापूर्व कोलकाता हायकोर्टाने कोरोना प्रोटोकॉलबाबत निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त केली होती.

    सरन्यायाधीश टीबीएन राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने तीन जनहित याचिकांवर सुनावणी करताना म्हटले की, कोरोना सुरक्षेबाबत परिपत्रके देणे आणि बैठका घेणे पुरेसे नाही. यानंतर निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना रोड शोला बंदी घालत सभांसाठी उपस्थितीची संख्या निश्चित केली आहे.

    पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना परिस्थितीमुळे आपला नियोजित बंगाल दौरा रद्द केला आहे. पंतप्रधान मोदींच्या चार सभा शुक्रवारी होणार होत्या. त्या सभांची तयारीही पूर्ण झाली होती. परंतु देशातील कारोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी बंगालमध्ये न जाता दिल्लीत उच्चस्तरीय बैठका घेणार आहेत.

    निवडणूक आयोगाच्या बंदीनंतर ममतांना आली जाग

    दुसरीकडे, निवडणूक आयोगाने सभांवर निर्बंधांसह रोड शोवर बंदी घातल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आपल्या निवडणूक सभा व रोड शो रद्द करत असल्याचे जाहीर केले आहे. पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचे एका दिवसात 11,948 रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान 56 रुग्णांचा मृत्यू झाला.

    पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यांत मतदान होत आहे. यापैकी सहा टप्प्यांतील मतदान झाले आहे. आज सहाव्या टप्प्यात 43 विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान पार पडले. सातव्या टप्प्यात 36 जागांवर 26 एप्रिल रोजी मतदान होईल. याशिवाय 35 जागांवर 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 2 मे रोजी होणार आहे.

    Road show in West Bengal banned by Election Commission, only 500 people allowed for Rallies

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र