विशेष प्रतिनिधी
लखनऊ : घराणेशाही नाही म्हणजे नाहीच, असे उत्तर प्रदेशात भाजपने दाखवून दिले आहे. नेत्यांच्या मुलांना उमेदवारी द्यायची नाही असे धोरण आखले आहे. त्यामुळे भाजपाच्या खासदार रिटा बहुगुणा- जोशी यांच्या मुलाने समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.Rita Bahuguna-Joshi’s son joins Samajwadi Party after BJP refuses ticket
भाजपा खासदार रिटा बहुगुणा जोशी यांचे चिरंजीव मयंक जोशी यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. मयंक जोशी सपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरूच होत्या, या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला. अखिलेश यादव यांनी निवडणुकीच्या व्यासपीठावरूनच मयंक जोशी यांच्या पक्ष प्रवेशाची घोषणा केली.
आझमगडमध्ये एका निवडणूक सभेला संबोधित करताना अखिलेश यादव यांनी मयंक जोशी यांचा सपामध्ये प्रवेश झाला असल्याची घोषणा केली. या घोषणेपूवीर्ही दोघांची भेट झाली होती. रीटा बहुगुणा जोशी यांनी आपल्या मुलाला तिकीट मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले होते, पण त्यांना अपयश आल्याचं सांगण्यात येत आहे.
गेल्या महिन्यात मयंक जोशी यांनी अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. तेव्हा ही भेट केवळ औपचारिक भेट असल्याचं सांगितलं गेलं होतं. मयंक यांना भाजपाकडून तिकीट न मिळाल्याने त्यांच्या नाराजीच्या बातम्या येत होत्या व ते समाजवादी पार्टीत प्रवेश करू शकतात, असे बोलले जात होते. मात्र, त्यानंतर रिटा बहुगुणा यांनी हे वृत्त फेटाळून लावले होते आणि त्यांच्या मुलाने पक्ष सोडल्याची बातमी केवळ अफवा असल्याचे म्हटले होते.
रिटा बहुगुणा या ज्येष्ठ नेते हेमवतीनंदन बहुगुणा यांच्य्या कन्या आहेत. कॉँग्रेसच्या नेत्या असलेल्या रिटा बहुगुणा यांनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली होती. त्यांनी ही निवडणूक जिंकलीही होती.
Rita Bahuguna-Joshi’s son joins Samajwadi Party after BJP refuses ticket
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींनी भूमिपूजन केलेले प्रकल्प महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकारने अडकवले!!… ही पाहा यादी!!
- बारावीच्या पेपरमध्ये चूक, चुकीच्या प्रश्नाचा विद्यार्थ्यांना मिळणार आता एक गुण जादा
- Ukraine Indian Students : पवार काय म्हणतात?, यापेक्षा विद्यार्थ्यांना भारतात आणणे महत्त्वाचे; डॉ. भागवत कराडांचे प्रत्युत्तर!!
- शिवमंदिरात नंदी पाणी पित असल्याची अफवा, मध्यप्रदेशात शिव मंदिरामध्ये भाविकांची गर्दी