इंडिया आघडीत बिघाडी… आडम मास्तरांना काँग्रेसचा कात्रजचा घाट
विशेष प्रतिनिधी
सोलापूर : Adam Master, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांना काँग्रेसने कात्रज चा घाट दाखवला आहे. काँग्रेसच्या पहिल्याच उमेदवार यादीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून बाबा मिस्त्री यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.Adam Master,
सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम इच्छुक होते.
लोकसभा निवडणुकीत माजी आमदार नरसय्या आडम यांनी इंडिया आघाडीतील घटक पक्ष या नात्याने प्रणिती शिंदे यांच्यासाठी काम केले होते. त्याचवेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मतदार संघ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मिळावा, अशी आग्रहाची मागणी केली होती.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव सीताराम येच्युरी यांची सुशीलकुमार शिंदे आणि सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाल्याचेही आडम यांनी सांगितले होते. मात्र, त्यावर सुशीलकुमार शिंदे यांनी कुठलेही भाष्य केले नव्हते.
लोकसभा निवडणुकीनंतर आडम मास्तर यांनी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. त्या भेटी त्यांनी ‘सोलापूर शहर मध्य’सह १२ मतदारसंघ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडावेत, अशी मागणी केली होती. पवारांनंतर आडम यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांचीही संगमनेर येथे जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची मागणी केली होती.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघ आडम मास्तर यांच्यासाठी सोडू नये, अशी मागणी काँग्रेसच्या विभागीय बैठकीत पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली आहे, त्यानंतर काँग्रेसच्या शहराध्यक्षांनीही हा मतदारसंघ आडम मास्तरांना सोडण्याचा प्रश्नच नाही, असे ठणकावून सांगितले होते. त्याप्रमाणे आता बाबा मिस्त्री यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
नरसय्या आडम मास्तर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात काँग्रेस पक्ष आपल्याला सोलापूर शहर मध्य मतदारसंघ सोडणार नाही, अशी भीती व्यक्त केली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागावे, असे आवाहन त्या कार्यक्रमातून केले होते. तीच भीती खरी ठरली आहे.
सोलापुरातील शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात
(सिव्हिल) रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर असलेले
बाबा मिस्त्री यांना २०१९मध्ये तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावि रोधात काँग्रेसने सोलापूर दक्षिणमधून बाबा मिस्त्री यांना मैदानात उतरविले होते. त्या निवडणुकीत सुभाष
देशमुख यांना ८७ हजार २२३ मते मिळाली होती, ते २९
हजार २४७ मताधिक्क्यांनी विजयी झाले. परंतु ऐनवेळी
काँग्रेसतर्फे लढत देणारे बाबा मिस्त्री यांना या
मतदारसंघातून ५७ हजार ९७६ मते मिळाली होती. मात्र यंदा त्यांना सोलापूर दक्षिण मधून उमेदवारी देण्याऐवजी सोलापूर शहर मध्य मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापूर शहर दक्षिण मधून धर्मराज काढादी हे काँग्रेसचे उमेदवार असतील.
“Rift in INDIA Alliance: Congress Sidelines Adam Master, Nominates Baba Mistry for Solapur City Central Seat”
महत्वाच्या बातम्या
- Sudhanshu Trivedi : सुधांशू त्रिवेदींचा विरोधकांवर ‘व्होट जिहाद’चा आरोप!
- NDA Chief Minister and : ‘NDA’च्या मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट!
- Uttar Pradesh : उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणुकीची तारीख पुढे ढकलली जाणार?
- Prashant Kishor प्रशांत किशोर यांची निवडणुकीच्या राजकारणात एन्ट्री