• Download App
    हिंदू कार्यकर्त्याचा शिरच्छेद करण्यासाठी एक कोटी रुपयांचे इनाम, बरेलीतील मौलानाला पोलीसांनी केली अटक|Reward of one crore rupees for beheading a Hindu activist,Maulana arrested

    हिंदू कार्यकर्त्याचा शिरच्छेद करण्यासाठी एक कोटी रुपयांचे इनाम, बरेलीतील मौलानाला पोलीसांनी केली अटक

    विशेष प्रतिनिधी

    बरेली : हिंदू कार्यकर्त्याचा शिरच्छेद करण्यासाठी एक कोटी रुपयांच्या इनामाची घोषणा करणाºया मदरसा शिक्षकाला पोलीसांनी अटक केली आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.Reward of one crore rupees for beheading a Hindu activist,Maulana arrested

    उत्तर प्रदेशातील बरेली येथील ३२ वर्षीय मौलाना हाफिज फैजान रजा नावाच्या एका मदरशातील शिक्षकाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये त्याने उत्तराखंड येथील एका हिंदू कार्यकर्त्याचा शिरच्छेद करणाºयास एक कोटी रुपयांचे इनाम देण्याची घोषणा केली होती.



    हिंदू भारती हे मुस्लिम समाजाच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्यांचा शिरच्छेद केला पाहिजे असे त्याने म्हटले होते. मौलानाने म्हटले आहे की इस्लामच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याचा विरोध केला जाईल. त्याला धडा शिकविला जाईल.

    बरेली पोलीसांना याबाबतची माहिती मिळाल्यावर दोन समाजात तेढ वाढविण्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ईज्जतनगर पोलीसांनी त्याला अटक केली आहे. हिंदू भारती हे उत्तराखंड संरक्षण अभियानाचे संस्थापक आहेत.

    या घटनेची माहिती पोलीसांना समजल्यावर मौलानाने लगेच एक व्हिडीओ टाकला. त्यामध्ये तो माफी मागताना दिसत आहे. त्याचबरोबर मौलानाच्या सहकाºयांनी त्याच्या डोक्यावर परिणाम झाल्याचेही म्हटले आहे.

    Reward of one crore rupees for beheading a Hindu activist,Maulana arrested

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    बिहारमध्ये परस्पर “तेजस्वी सरकारची” घोषणा; पण काँग्रेसच्या बरोबर महागठबंधनचा अद्याप ना आता, ना पता!!

    Sushma Andhare : सरन्यायाधीश भूषण गवई तुम्ही पापी आहात; सुषमा अंधारे यांचे खुले पत्र; RSSच्या कार्यक्रमाला नकार देता म्हणजे काय?

    64 आणि 74 वर्षांचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री 35 वर्षांच्या नेत्याच्या घरी; बिहारमध्ये राहुलच्या कर्तृत्वाची वाचा कहाणी खरी!!