• Download App
    रेपो दर वाढविला, कर्ज महागले; ग्राहकांना फटका, बॅंकांनी वाढवले व्याजदर!! Repo rate hiked, debt expensive; Consumers hit, banks increase interest rates

    रेपो दर वाढविला, कर्ज महागले; ग्राहकांना फटका, बॅंकांनी वाढवले व्याजदर!!

    प्रतिनिधी

    मुंबई : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात वाढीचा निर्णय घेतल्याने, कर्ज महागणार हे निश्चित झाले होते. महागाई आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय बॅंकेने हे पाऊल उचलले आहे. बॅंकेने रेपो दरात 0.50 बेसिस पॉईंटने वाढ केली. Repo rate hiked, debt expensive; Consumers hit, banks increase interest rates

    त्यामुळे रेपो दर कोविड काळातील 5.40 टकक्यांपर्यंत पोहचला आहे. या निर्णयानंतर खासगी क्षेत्रातील ICICI आणि सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बॅंकेने व्याजदर प्रभावी राहणार असल्याचे, बँकांनी स्पष्ट केले.

    ICICI बॅंकेने व्याजदरवाढी विषयीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, ICICI बॅंक बाह्य मानक कर्ज दर म्हणजेच बाह्य बेंचमार्क आधारिक कर्ज दर रेपो दरावर आधारित आहेत. केंद्रीय बॅंकेच्या धोरणानुसार, त्यात बदल होतो. रेपो दरात वाढ झाल्याने, आयसीआयसीआय बॅंकेने कर्जावरील व्याज वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

    I-EBLR आता वार्षिक 9.10 टक्के असून, तो 5 ऑगस्ट 2022 पासून लागू असेल, असे बॅंकेने दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. 8ऑगस्टपासून रेपो संबंधित कर्ज दर 7.40 टक्क्यांवरुन 7.90 टक्के करण्यात आला आहे. हा वाढीव दर 8 ऑगस्ट 2022 पासून लागू असेल. रेपो दरावर कर्जाचे दर अवलंबून असतात.

    Repo rate hiked, debt expensive; Consumers hit, banks increase interest rates

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    RBI Report FY25, : देशात आता 2.51 लाख ATM; वर्षभरात 2,360 ATM बंद; डिजिटल पेमेंट वाढल्याचा परिणाम

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष