• Download App
    लक्षात ठेवा, तृणमूल कॉँग्रेसच्या मुख्यमंत्री आणि नेत्यांना दिल्लीत यावे लागते, भाजपा खासदाराचा संतप्त इशारा|Remember, Trinamool Congress chief ministers and leaders have to come to Delhi, an angry warning from a BJP MP

    लक्षात ठेवा, तृणमूल कॉँग्रेसच्या मुख्यमंत्री आणि नेत्यांना दिल्लीत यावे लागते, भाजपा खासदाराचा संतप्त इशारा

    पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून तृणमूल कॉँग्रेसने प्रचंड हिंसाचार सुरू केला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. दिल्लीतील भाजपाचे खासदार परवेश साहिब यांनी संतप्त होऊन तृणमूल कॉँग्रेसच्या मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांनाही दिल्लीत यावे लागते हे लक्षात ठेवा, असा इशारा दिला आहे.Remember, Trinamool Congress chief ministers and leaders have to come to Delhi, an angry warning from a BJP MP


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून तृणमूल कॉँग्रेसने प्रचंड हिंसाचार सुरू केला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे.

    दिल्लीतील भाजपाचे खासदार परवेश साहिब यांनी संतप्त होऊन तृणमूल कॉँग्रेसच्या मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांनाही दिल्लीत यावे लागते हे लक्षात ठेवा, असा इशारा दिला आहे.



    राज्यात विधानसभेची निवडणूक संपताच राजकीय हिंसाचाराची मालिका सुरू झाली आहे. निकालाच्या दिवशीच कोलकातामधील भाजपा कार्यालयाला आग लावण्यात आली होती. सोमवारी पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांना मारहाण करत हत्या केल्याची बातमी समोर आली होती.

    याच पार्श्वभूमीवर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे खासदार परवेश साहिब यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी निवडणूक जिंकल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांची हत्या केली. तसेच त्यांनी गाडीची तोडफोड करत अनेक घरांना आगी लावल्या.

    निवडणुकीत विजय आणि पराभव होत असतो पण हत्या नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवा की, तुमच्या नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांनाही दिल्लीत यावे लागते .
    उत्तराखंडचे भाजप खासदार अनिल बलूनी यांनीही काल झालेल्या घटनेवर तृणमूलवर हल्लाबोल केला आहे.

    दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला असनू त्यात त्यांनी लिहिले की, बंगालमधील हिंसाचारांची ही पटकथा यापूर्वीच लिहिलेली गेलेली होती. खुद्द ममता बॅनर्जी यांनी सेंट्रल फोर्स गेल्यावर तुम्हाला कोण वाचवणार असे म्हटले होते.

    म्हणजेच बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा खेळ टीएमसीने आधीच सेट केला होती. लज्जास्पद! असे लिहीत त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन शेअर केले.

    उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील भाटपाडा येथे काही लोकांकडून भाजपच्या कार्यालयात आणि काही दुकानांवर हल्ला करत तोडफोड केली आहे. यावेळी बॉम्बही टाकण्यात आले.

    कूचबिहारमधील सीतलकुचीतून ही हिंसाचाराची घटना समोर येत आहे. तर दुसरीकडे, नंदीग्राममध्ये भाजपा कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.

    Remember, Trinamool Congress chief ministers and leaders have to come to Delhi, an angry warning from a BJP MP

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य