वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अमेरिकी संरक्षण मंत्रालय पेंटॅगॉनकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या ताज्या अहवालामध्ये अरुणाचल प्रदेशात चीनने एका वेगळ्या खेड्याची निर्मिती केल्याचा दावा करण्यात आला होता पण संबंधित खेडे हे सध्या चीनचा ताबा असलेल्या प्रदेशातच असल्याची माहिती संरक्षण विभागातील सूत्रांनी दिली. Relevant villages in Arunachal Pradesh are within China’s borders, dispelling doubts about the Pentagon’s report
उभय देशांच्या सीमेला लागून असलेल्या अप्पर सुबानसिरी जिल्ह्यात हे खेडे असून या भागावर चीनचा कब्जा आहे. चीनने लष्करी कारवाया करण्यासाठी या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामे केली होती. मागील सहा दशकांपासून हा भाग चीनच्या ताब्यात आहे.
पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) १९५९ मध्ये आसाम रायफलच्या ताब्यातून हे ठाणे हिसकावून घेतले होते. इतिहासामध्ये हीच घटना लोग्जू प्रसंग म्हणून देखील ओळखल्या जातो. पेंटॅगॉनने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये या खेड्याचा उल्लेख केल्यानंतर एकच खळबळ निर्माण झाली होती. संरक्षण मंत्रालयानेही याबाबत भाष्य करण्यास नकार दिल्यानंतर त्याचे गूढ आणखीनच वाढले होते.
Relevant villages in Arunachal Pradesh are within China’s borders, dispelling doubts about the Pentagon’s report
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी