वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिवाळीनंतर ऑईल कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) दरात कपात केली आहे. ही कपात तात्काळ लागू झाली आहे. कमर्शियल गॅस सिलेंडर दरात 115.50 रुपयांची घट करण्यात आली असून घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर आहेत. जून महिन्यानंतर सिलेंडर दरात कपात करण्याची ही सातवी वेळ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसचे दर घसरल्याने देशांतर्गतही एलपीजीचे दर कमी करण्यात आले आहेत. 19 किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात 115.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टॉरंटसह आदींना मोठा दिलासा मिळाला आहे. याचा लाभ ग्राहकांना मिळण्याची अपेक्षा आहे.Reduction in LPG Cylinder Rates; Commercial gas cylinder cheaper by Rs 115
कमर्शियल वापराच्या 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरचे भाव आता 1744 रुपये झाले आहेत. यापूर्वी हे सिलिंडर दिल्लीत 1859 रुपयांना मिळत होते. कोलकातामध्ये 19 किलोवाला हा सिलिंडर आता 1846 रुपयांना मिळणार आहे. याची किंमत आधी 1959 रुपये होती.
तर मुंबईत या 19 किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत 1,811.50 रुपयांऐवजी आता 1,696 रुपये असणार आहे. तर चेन्नईत या सिलिंडरची किंमत 2,009.50 रुपयांऐवजी 1,893 रुपये असणार आहे. आजपासूनच ही दर कपात लागू करण्यात आली आहे.
1 ऑक्टोबर रोजी कमर्शियल गॅस सिलिंडरचे दर कमी करण्यात आले होते. वाजवीपेक्षा या गॅस सिलिंडरची किंमत अधित होती. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात कमी आली होती. त्यामुळे कमर्शियल गॅस सिलिंडरचे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमती जैसे थेच राहणार आहेत. 6 जुलै रोजी 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपये प्रति युनिटने वाढ करण्यात आली होती. यापूर्वी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 19 मे 2022 रोजी बदल करण्यात आले होते.
राजधानी दिल्लीत सध्या घरगुती वापराचा गॅस 1053 रुपये प्रति युनिटने मिळतो. तर कोलकात, मुंबई, चेन्नईत अनुक्रमे 1,079 रुपये, 1,052.5 रुपये आणि 1,068.5 रुपयांनी विकला जातो.
Reduction in LPG Cylinder Rates; Commercial gas cylinder cheaper by Rs 115
महत्वाच्या बातम्या
- सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त देशवासीयांना एकतेची शपथ!!
- पुण्यात मेट्रोच्या तिकिटासाठी आता रांगेत थांबण्याची नाही गरज; घ्या डिजिटल तिकीटे
- सरदार वल्लभभाई पटेल जयंती : भारतरत्न किताबाची वाचा “वेगळी” गोष्ट!!
- बेस्ट, सिटी बसप्रमाणे एसटीचे ही कळणार लाईव्ह लोकेशन; लवकरच अॅपमध्येही सुविधा
- महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर; 2000 कोटींची गुंतवणूक!!