• Download App
    रिझर्व्ह बॅंकेच्या पवित्र्यामुळे बॅंका येणार ताळ्यावर, यापुढे एटीएममध्ये पैसे नसल्यास बँकांना होणार दंड|RBI will now fined Banks If they not put cash in ATM

    रिझर्व्ह बॅंकेच्या पवित्र्यामुळे बॅंका येणार ताळ्यावर, यापुढे एटीएममध्ये पैसे नसल्यास बँकांना होणार दंड

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – अनेक बँकांच्या एटीएममध्ये बऱ्याचदा रोख नसल्याने ग्राहकांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे इतर बँकांच्या एटीएमवर विसंबून रहावे लागते. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यावर आता बॅंकाना थेट दंड ठोठावणार असल्याचे जाहीर केले आहे.RBI will now fined Banks If they not put cash in ATM

    समजा एटीएममध्ये एका महिन्यात १० तासांहून अधिक काळ रोख रक्कम शिल्लक नसल्यास यापुढे बँकांकडून रिझर्व्ह बँक दंड आकारेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परिपत्रकाद्वारे हा आदेश काढला आहे. या नियमाची अंमलबजावणी एक ऑक्टोबरपासून होईल. या निर्णयानुसार रक्कम नसलेल्या प्रत्येक एटीएमसाठी दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.



     

    या आदेशामुळे यापुढे बँकांना आपल्या एटीएममध्ये कायम रोख ठेवणे आवश्यक झाले आहे. ज्या बँकांच्या एटीएममध्ये आरबीआयने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त काळ रोख नसेल तर त्या बँकांना आरबीआय दंड ठोठावेल.

    RBI will now fined Banks If they not put cash in ATM

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य