Monday, 12 May 2025
  • Download App
    पेट्रोल-डिझेलच्या दरांवरून राऊत, मलिक यांची केंद्रावर टीका; पण महाराष्ट्रात व्हॅट कधी कमी करणार?|Raut, Malik criticize Center over petrol-diesel rates; But when will VAT be reduced in Maharashtra

    पेट्रोल-डिझेलच्या दरांवरून राऊत, मलिक यांची केंद्रावर टीका; पण महाराष्ट्रात व्हॅट कधी कमी करणार?

    प्रतिनिधी

    मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये अनुक्रमे 5.00 आणि 10.00 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे सर्व राज्यांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर उतरले आहेत. अर्थात या मुद्द्यावरून शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.Raut, Malik criticize Center over petrol-diesel rates; But when will VAT be reduced in Maharashtra

    आधी 100 रुपये वाढवायचे आणि नंतर 5.00 रुपये कमी करायचे, यात कसले आहे मोठे मन?, अशा शब्दांत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे, तर तुम्ही जेवढ्या वेळा भाजपचा निवडणुकीत पराभव कराल तितक्या वेळा पेट्रोल डिझेलचे दर 5.00 रुपयांनी कमी होतील, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. परंतु या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवरचा मूल्यवर्धित कर अर्थात व्हॅट कधी कमी करणार?, याविषयी चकार शब्द काढलेला नाही.



    केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल वरचे उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा, बिहार, त्रिपुरा, आसाम, गुजरात, उत्तराखंड आदी राज्यांनी आपापल्या हिशेबानुसार मूल्यवर्धित कर अर्थात व्हॅट कमी केला. त्यामुळे संबंधित राज्यांमध्ये पेट्रोल, डिझेलचे भाव आणखी कमी होण्यास मदत झाली. हे भावा आता या राज्यांमध्ये 10.00 ते 15.00 रुपयांच्या रेंजमध्ये कमी झाले आहेत.

    परंतु महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारने मात्र अद्याप पेट्रोल आणि डिझेल वरचा व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतलेला नाही. उलट संजय राऊत आणि नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवरच यानिमित्ताने टीका करून घेतली आहे, तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केंद्र सरकारकडे उत्पादन शुल्कामध्ये आणखी सवलत मागितली आहे.

    Raut, Malik criticize Center over petrol-diesel rates; But when will VAT be reduced in Maharashtra

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट