वृत्तसंस्था
नवी दिल्ली : योगगुरू रामदेवबाबा यांचे अॅलोपॅथीविषयीचे आणि कोरोनिल किटबाबतचे वक्तव्य हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाचे म्हंटले असून त्यांच्याविरूद्ध कोणताही अंतरिम आदेश मंजूर करण्यास नकार दिला. Ramdev Baba’s Statement on Allopathy Part of Freedom of Expression: Delhi High Court
रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथी बनावट आहे, अशा आशयाचे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. त्यावरून दिल्ली मेडिकल असोसिएशनने (डीएमए) रामदेव बाबा आणि इतरांविरूद्ध दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने अंतरिम आदेश मंजूर करण्यास नकार दिला असून पुढील सुनावणी आता १३ जुलै रोजी होणार आहे.
रामदेव बाबा चुकीच्या पद्धतीने कोरोनिल या कोरोनावरील उपचार असल्याचं भासवत असून अॅलोपथीबद्दल चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप याचिकेत केला आहे. न्यायालयाने रामदेव बाबांना समन्स बजावत पुढील सुनावणीपर्यंत नव्या उपचारपद्धतीविरोधात कोणतंही वक्तव्य करु नये,असा सल्ला दिला आहे. मात्र त्यांचं उत्तर येईपर्यंत निर्बंधाचा कोणताही आदेश देण्यास नकार दिला आहे. अॅलोपथी व्यवसाय इतका नाजूक नाही असंही न्यायालयाने सांगितले.
न्यायमूर्ती सी हरि शंकर म्हणाले की अलोपॅथी व्यवसाय इतका नाजूक नाही की, डॉक्टरांनी न्यायालयात धाव घ्यावी. डीएमएला सांगितले की, न्यायालयात वेळ घालविण्याऐवजी सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी साथीच्या रोगावर उपचार शोधण्याचे मार्ग शोधण्यात रस घ्यावा.”
”देशात कलम १९ (१ )(अ) नावाची एक गोष्ट आहे. एखादे विज्ञान बनावट आहे असे सार्वजनिक विधान केले तर त्याबद्दल काय कारवाई करता येईल, याबाबत न्यायालयाने म्हंटले आहे की, रामदेव यांचे वक्तव्य “जनमत” असे आहे, असे संबोधत असून त्यासाठी त्यांना बेड्या घालण्याची गरज नाही. मत प्रसारित करण्याचा किंवा व्यक्त करण्याचा अधिकार त्यांना आहे.
Ramdev Baba’s Statement on Allopathy Part of Freedom of Expression: Delhi High Court
महत्त्वाच्या बातम्या
- फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला जामीन नाकारला
- देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात, मुंबई ठरली देशात अव्वल
- लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी थोपटली जवानांची पाठ, शस्त्रसंधीला १०० दिवस पूर्ण
- मनी मॅटर्स : कुटुंबाचा अर्थसंकल्प म्हणजे काय?
- इस्राईलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची गच्छंती अटळ, सत्ता स्थापनेसाठी सर्व विरोधक एकत्र
- कॅनडात निवासी शाळेच्या जागेत २१५ मुलांचे सांगाडे, धर्मांतराप्रकरणी पोप यांनी माफी मागावी