• Download App
    "राम आमचे कुलदैवत आणि मी त्यांचा भक्त आहे" ; काँग्रेस आमदार इक्बाल हुसेन यांचं विधान! Rama is our family deity and I am his devotee Statement of Congress MLA Iqbal Hussain

    “राम आमचे कुलदैवत आणि मी त्यांचा भक्त आहे” ; काँग्रेस आमदार इक्बाल हुसेन यांचं विधान!

    आपण ‘रामोत्सव’ भव्य पण धर्मनिरपेक्ष पद्धतीने साजरा करणार असल्याचे सांगितले

    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू : कर्नाटक काँग्रेसचे आमदार एच ए इक्बाल हुसैन यांनी गुरुवारी सांगितले की, राम हे त्यांचे ‘कुलदैवत’ आहेत आणि ते त्यांचे भक्त आहेत. रामनगरच्या आमदार असलेल्या हुसैन यांनी आपण ‘रामोत्सव’ भव्य पण धर्मनिरपेक्ष पद्धतीने साजरा करणार असल्याचे सांगितले. Rama is our family deity and I am his devotee Statement of Congress MLA Iqbal Hussain

    “मी आधीच सांगितले आहे की मी राम भक्त आहे. मी सर्व देवांची पूजा करतो आणि त्यांचे स्वागत करतो. यात काही शंका नाही,” असे हुसेन यांनी पत्रकारांना सांगितले.


    Congress-BJP : काँग्रेस – भाजप राष्ट्रीय पक्ष; सर्वांत बड्या ओबीसी व्होट बँकेकडे बारकाईने लक्ष!!


    सरस्वती, लक्ष्मी, गणेश आणि राम यांची लहानपणापासून पूजा करत असल्याचेही त्यांनी सांगितले. “मी सर्व राजकीय पक्षांनी हातमिळवणी करून ‘रामोत्सव’ भव्य पण धर्मनिरपेक्ष पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले आहे,” असं हुसेन म्हणाले.

    अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीवर ते म्हणाले, ‘काही लोक आपल्या राजकीय फायद्यासाठी काहीतरी करतात पण काँग्रेस कधीच देव आणि धर्माचा वापर करून लोकांमध्ये फूट पाडत नाही. काँग्रेसची विचारधारा, बांधिलकी आणि शिस्त आहे, ज्याचे मी पालन करतो,” ते म्हणाले.

    Rama is our family deity and I am his devotee Statement of Congress MLA Iqbal Hussain

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Kangana Ranaut : तरुणांना राष्ट्रपतींचे नाव सांगता न आल्याने कंगना रनोट संतापल्या; युद्ध नव्हे टोळांसारखा मेंदू असलेली पिढी नक्कीच नाश करेल!

    Air Marshal : इंडियन आर्मीचा पाकला सज्जड दम; एअरस्ट्राइकवर एअर मार्शल म्हणाले- आमचे कवच कायम सक्रिय

    Pakistani Army Chief : पाकिस्तानी लष्करप्रमुख म्हणाले- देशाला दिलेले वचन पूर्ण केले; भारतीय सैनिक आम्हाला घाबरवू शकत नाहीत