विशेष प्रतिनिधी
जयपूर : कर्नाटकात काँग्रेसने हनुमान मंदिरे बांधण्याचे आश्वासन दिल्यानंतर पक्षाला सत्तेचा लाभ झाला. आता तोच प्रयोग काँग्रेसने राजस्थानात सुरू केला असून राहुल गांधींच्या टेम्पल रन सारखाच हिंदू अजेंडा हा प्रयोग आहे.Rajasthan Congress Election Hindu Agenda; Yellow flags hoisted on temples on Gurupushya Yoga; Crores spent on temple development!!
राजस्थानात काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदू मंदिरांसाठी काही योजना आखल्या. आजच्या गुरुपुष्य योगावर राजस्थानातल्या सर्व मंदिरांवर काँग्रेसने ओम अंकित पिवळे ध्वज फडकवले आहेत. जयपूरच्या कल्की मंदिरापासून त्याची सुरुवात झाली आहे. पिवळा रंग हा गुरू ग्रहाचा मानला जातो. त्यामुळे काँग्रेसने मंदिरांवर भडकवण्यासाठी च्या ध्वजाचा रंग पिवळा निवडला आहे, अशी माहिती राजस्थानच्या देवस्थान ट्रस्ट मंत्री शकुंतला रावत यांनी दिली.
- प्रत्यक्षात काँग्रेसने आपली आयडेंटिटी भाजपपासून वेगळी ठेवण्यासाठी मंदिरांवर फडकवण्यासाठी भगवा ध्वज नको म्हणून पिवळ्या ध्वजाची निवड केली आहे.
- मुख्यमंत्री अशोक गेहलोत त्यांचा सेवा परमो धर्मः हा मंत्र जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम केला आहे, असे त्यांनी सांगितले.
- त्याचबरोबर राजस्थानात 593 मंदिरांमध्ये रंगरंगोटीसाठी 593 लाख रुपये खर्च करण्याची योजना देवस्थान ट्रस्ट मंत्रालयाने तयार केली आहे. पुजार्यांचे मानधन 3000 रुपयांवरून 5000 रुपये केले आहे.
- नाथद्वारच्या जलदेव माताजी मंदिर सांसेरा येथे मोठ्या प्रमाणावर विकास योजनांसाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी 10 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
- त्याचबरोबर राजस्थानातल्या गोविंद देव मंदिराचा विकास महाकाल कॉरिडॉर सारखा करण्याची योजना सरकारने आखली आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थयात्रा
ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने तीर्थयात्रा योजना आखली होती. त्यामध्ये सुरुवातीला 2000 ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडवण्याचे ठरविले होते. परंतु आता त्या योजनेत आणखी 20000 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करून एकूण 40000 ज्येष्ठ नागरिकांना राजस्थान सरकार तीर्थयात्रा घडवून आणणार आहे. या तीर्थयात्रेमध्ये अयोध्या, काशी, मथुरा, चारधाम तसेच श्रवणबेळगोळचाही समावेश केला आहे. यातून एक प्रकारे काँग्रेस भाजपच्याच धर्तीवर हिंदुत्वाच्या दिशेने निघाली आहे. पण फक्त हिंदुत्वाचे नाव घेण्यापासून काँग्रेस स्वतःचा बचाव करत आहे
Rajasthan Congress Election Hindu Agenda; Yellow flags hoisted on temples on Gurupushya Yoga; Crores spent on temple development!!
महत्वाच्या बातम्या
- बँकांमधून आजपासून 2000 च्या नोटा मिळणार बदलून, पण धावपळीची गरज नाही; रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचा निर्वाळा
- 2000 ची आणण्याच्या बाजूने नव्हते मोदी, साठेबाजीचा सांगितला होता धोका, इच्छा नसूनही द्यावी लागली होती परवानगी
- मुख्यमंत्री हिमंता यांचा दावा, आसाममधून यावर्षी ‘AFSPA’ हटवण्यात येईल
- थोरला नाही, धाकटा नाही, भाऊबंदकी चालणार नाही; महाविकास आघाडीत काँग्रेसचा नवा मेरिट फॉर्म्युला!!