विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मनसेचा महाराष्ट्रातल्या महायुतीत समावेश करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याशी चर्चा करून त्यांच्यासह राज ठाकरे दिल्लीत अमित शाह यांच्या घरी पोहोचले, पण त्याचवेळी मनसेला महाविकास आघाडीत घ्यायची तयारी पवारांच्या राष्ट्रवादीने दाखविली. Raj Thackeray and Vinod Tawde reach the residence of Amit Shah in Delhi
एकीकडे महाविकास आघाडीतून वंचित बहुजन आघाडीची वजाबाकी होत असताना दुसरीकडे महायुतीमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेची बेरीज होत आहे.
या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवारांनी राज ठाकरे यांना महाराष्ट्र धर्माची आठवण करून देत महाविकास आघाडीत सामील होण्याचे आवाहन केले. देशात बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार यांच्याविरुद्ध महाविकास आघाडी लढा उभारत आहे. या लढ्यात सगळ्या लोकांनी सामील व्हायला पाहिजे, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले, तर राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीमध्ये सामील होऊन महाराष्ट्र धर्माचे पालन करावे, असे आवाहन रोहित पवारांनी केले. त्यासाठी त्यांनी आपण राज ठाकरे यांच्या भाषणाचे फॅन आहोत, असे मधाचे बोट लावले.
पण सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी हे सगळे केले, केव्हा??, तर राज ठाकरे दिल्लीत पोहोचल्यानंतर. ते काल रात्रीच दिल्लीत पोहोचले, पण आज सकाळी विनोद तावडे यांनी त्यांची हॉटेलवर जाऊन भेट घेतली आणि राज ठाकरे यांना बरोबर घेऊन विनोद तावडे अमित शाह यांच्या घरी त्यांच्या भेटीसाठी पोहोचले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आधीच दिल्लीमध्ये आहेत.
भाजपच्या नेत्यांबरोबर राज ठाकरे यांच्या गंभीर वाटाघाटी सुरू आहेत. त्याचा परिणाम फक्त लोकसभेपुरता किंवा लोकसभेच्या एक दोन जागांपुरता मर्यादित नाही, तर तो सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर अधिक होणार आहे. याची जाणीव आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला झाली आहे.
त्यापूर्वी राज ठाकरेंनी अनेकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातिवाद वाढला. जातिवादाला शरद पवारांनी खतपाणी घातले, असा वारंवार आरोप केला. त्यावेळी पवारांच्या राष्ट्रवादीतून राज ठाकरेंवर अनेक वेळा प्रहार करण्यात आले, पण आता ज्यावेळी राज ठाकरे महायुतीत निर्णयच्या एन्ट्री करत आहेत त्यावेळी मात्र पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना “जाग” येऊन ते महाराष्ट्र धर्माची आठवण करून देत राज ठाकरेंना महाविकास आघाडीत सामील होण्याचे आवाहन करत आहेत.