• Download App
    गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या भेटवस्तूंच्या लिलावातून ६ लाख रुपयांची रक्कम गोळा|Raise Rs 6 lakh from former Gujarat Chief Minister Vijay Rupani's gift auction

    गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या भेटवस्तूंच्या लिलावातून ६ लाख रुपयांची रक्कम गोळा

    विशेष प्रतिनिधी

    अहमदाबाद : गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावातून सहा लाख रुपयांची रक्कम गोळा झाली आहे. एकूण ६३३ वस्तू सुमारे सहा लाख रुपयांना विकल्या गेल्या. ही रक्कम कन्या केळवणी निधीसाठी दिली जाणार आहे.Raise Rs 6 lakh from former Gujarat Chief Minister Vijay Rupani’s gift auction

    १३ आणि १४ सप्टेंबरला सुरत येथील सायन्स सेंटर हॉलमध्ये झालेल्या लिलावात फोटो फ्रेम, पगडी, तलवारी, फिरकी चाके, रुपाणी यांची ३० छायाचित्रे, महात्मा गांधींचे तीन फोटो, स्टॅच्यू ऑफ युनिटीचे 11 मॉडेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची छायाचित्रे यांचा लिलाव झाला.



    या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. सर्व वस्तू दोन दिवसात विकल्या गेल्या. यामध्ये राजकारण्यांसह वकील, विद्यार्थी, रिअल इस्टेट डेव्हलपर्स आणि व्यापारी सहभागी झाल्या होत्या. सोने आणि चांदीच्या वस्तू वगळता इतर वस्तूंच्या किमती २५ रुपयांपासून चार हजार रुपयांपर्यंत होत्या.

    हा लिलाव उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाºयांच्या देखरेखीखाली करण्यात आला.कतारगामचे उपजिल्हधिकारी पार्थ गोस्वामी म्हणाले, लिलावात ठेवलेल्या सर्व वस्तू विकल्या गेल्या. जमा झालेल्या सहा लाख रुपयांची रक्कम कन्या केळवणी निधीसाठी दिली जाणार आहे.

    Raise Rs 6 lakh from former Gujarat Chief Minister Vijay Rupani’s gift auction

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    LPG Tankers : द फोकस एक्सप्लेनर : देशाला दरमहा ३० LPG टँकरची गरज; त्यापैकी ६ होर्मुझमध्ये अडकले, गॅस पुरवठ्याचे पुढे काय?

    PM Modi : मोदींची 24 तासांत 4 राष्ट्राध्यक्षांशी चर्चा; मॅक्रॉन यांना सांगितले- पश्चिम आशियातील तणाव कमी करणे आवश्यक

    Sanjay Dutt : नोरा-संजयच्या वादग्रस्त गाण्यावर महिला आयोगाची कारवाई; दोघांनी 24 मार्चपर्यंत हजर राहावे, अन्यथा कायदेशीर कारवाई